Tuesday, April 30, 2024

blog link

 https://pudhari.news/blog/782278/maharashtra-day-special-explore-sahyadri-pawankhind-vishalgad-paleshwar-waterfall-and-manoli-dam-tourism/ar 


https://pudhari.news/maharashtra/354607/best-places-in-ratnagiri-tourism-know-about-rajapur-tourism/ar


https://pudhari.news/blog/342780/know-anout-konkan-tourism-dhamapur-bhagvati-devi-temple-and-ratris-khel-chale-wada/ar


https://pudhari.news/features/778413/goa-panjim-beautiful-shri-maruti-temple-shri-hanuman-madir/ar


https://pudhari.news/features/767486/maharshtra-tourism-satara-mahabaleshwar-pustakanch-gaav-bhilar-lingamala-waterfall-explore/ar


https://pudhari.news/blog/342780/know-anout-konkan-tourism-dhamapur-bhagvati-devi-temple-and-ratris-khel-chale-wada/ar


https://pudhari.news/features/754908/satara-wai-places-explore-best-places-for-movies-shooting-and-photography/ar


https://pudhari.news/maharashtra/376761/gaonkhadi-ganeshgule-malgund-know-about-famous-destinations-in-ratnagiri/ar


https://pudhari.news/blog/439099/discover-konkan-best-beaches-and-tourist-places-in-vengurla/ar


https://pudhari.news/maharashtra/426674/unexplored-maharashtra-konkan-travel-hidden-beautiful-places/ar


https://pudhari.news/maharashtra/390582/unexplored-konkan-tambaldeg-dahibav-mithbav-and-others-hidden-places/ar


https://pudhari.news/blog/473862/discover-konkan-ratnagiri-konkan-kasheli-kankaditya-temple-purngad-pawas-ganeshgule/ar


https://pudhari.news/maharashtra/461175/konkan-coastal-tourism-ratnagiri-travel-ganeshgule-nandivade-beach-and-others/ar


https://pudhari.news/blog/487308/maharashtra-konkan-tour-velneshwar-bamanghal-and-hedavi-tavsal-pheri-boat/ar


https://pudhari.news/blog/492505/konkan-shrivardhan-kalinje-kandalvan-safari-harihareshwar-velas-tourism/ar


https://pudhari.news/features/688478/konkan-vengurla-tourism/ar


https://pudhari.news/features/684127/tarkarli-devbag-konkan-maharashtra-tourism-best-places/ar


https://pudhari.news/features/youthworld/758888/maharashtra-tourism-konkan-sindhudurg-walaval-explore-lakshmi-narayan-ravalnath-temple-karli-river/ar


https://pudhari.news/features/youthworld/170781/famous-beach-in-ratnagiri-district-known-as-ambolgad/ar


https://pudhari.news/maharashtra/337008/travel-tour-how-to-reached-devghali-beach-at-kasheli-in-rajapur-ratnagiri/ar


https://pudhari.news/maharashtra/331651/travel-destination-these-5-places-are-best-for-couples/ar


https://wortheum.news/yavatmal/@krushnarendracha/1-day-ago


https://pudhari.news/features/439099/discover-konkan-best-beaches-and-tourist-places-in-vengurla/ar


https://pudhari.news/latest/688478/konkan-vengurla-tourism/ar

https://pudhari.news/maharashtra/461175/konkan-coastal-tourism-ratnagiri-travel-ganeshgule-nandivade-beach-and-others/ar


https://pudhari.news/features/tour-and-travels/758888/maharashtra-tourism-konkan-sindhudurg-walaval-explore-lakshmi-narayan-ravalnath-temple-karli-river/ar


https://pudhari.news/latest/479855/discover-of-sindhudurg-devbag-malvan-and-sindhudurg-tourism/ar


https://pudhari.news/blog/342780/know-anout-konkan-tourism-dhamapur-bhagvati-devi-temple-and-ratris-khel-chale-wada/ar


https://pudhari.news/maharashtra/354607/best-places-in-ratnagiri-tourism-know-about-rajapur-tourism/ar


https://pudhari.news/maharashtra/622526/shravan-2023-maharashtra-sangmeshwar-karneshwar-temple/ar


https://pudhari.news/features/754908/satara-wai-places-explore-best-places-for-movies-shooting-and-photography/ar


https://pudhari.news/features/767486/maharshtra-tourism-satara-mahabaleshwar-pustakanch-gaav-bhilar-lingamala-waterfall-explore/ar


https://pudhari.news/blog/342780/know-anout-konkan-tourism-dhamapur-bhagvati-devi-temple-and-ratris-khel-chale-wada/ar


https://pudhari.news/maharashtra/376761/gaonkhadi-ganeshgule-malgund-know-about-famous-destinations-in-ratnagiri/ar


https://pudhari.news/blog/784073/mystery-of-devache-gothane-barsu-katalshilp-petroglyphs-rajapur-ratnagiri-konkan-maharashtra-tourism/ar


https://pudhari.news/blog/630627/these-five-famous-mysterious-shiva-temples/ar

Maharashtra Day Special Explore Sahyadri : पावनखिंड-विशाळगडच नव्हे तर 'पालेश्वर'चा धबधबा, 'मानोली'ही आहे खास

 

पश्चिम घाटाचे सौंदर्य काय आणि किती वर्णावे. पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले विशाळगड हे निसर्ग संपन्न असलेले पर्यटन स्थ‍ळ होय. अणुस्कुरा खिंड आणि आंबा घाट हे कोल्हापूरच्या बाजारपेठेला कोकण बंदरांशी जोडणारे ठिकाण. (Maharashtra Day Special Explore Sahyadri) अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार 'विशाळगड' आहे. नावाप्रमाणेच विशाल असणारा हा गड सर करण्यासाठी अनेक ट्रेकर्स, पर्यटक आणि भाविक इथे येतात. राम मंदिर, मलिक रेहान दर्गा याठिकाणे असंख्य हिंदू-मुस्लिम भाविक हजेरी लावतात.


 खासकरून कर्नाटकातून इथे येणारी भाविकांची संख्या खूप आहे. आम्ही तुम्हाला या लेखामध्ये पावनखिंड, विशाळगड, पालेश्वर धबधबा, मानोली धरण, कोकण दर्शन अशा असंख्य पर्यटनस्थळांची माहिती देणार आहोत. कोल्हापुरातून विशाळगडला जाणार असाल एका दिवसात ही स्थळे तुम्हाला पाहता येतील. पण थोडी विश्रांती हवी असल्यास यासाठी दोन दिवसांचा वेळ लागेल. दुचाकी-चारचाकीने ही ट्रीप अविस्मरणीय ठरेल. (Maharashtra Day Special Explore Sahyadri)

पैजारवाडी -

कोल्हापुरातून विशाळगडला जात असाल तर वाटेत पैजारवाडी हे गाव लागते. कासवाच्या आकारातील चिले महाराजांचे खूप मोठे मंदिर येथील आकर्षण आहे. 



हे मंदिर पाहण्यासारखे आहे. या मार्गाने पुढे जाताना अनेक भाविक-पर्यटक याठिकाणी आवर्जुन भेट देतातचं.



विशाळगड -

गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दमछाक होऊ नये म्हणून गडावर चढताना स्थानिक लोकांची थंडगार पेय असलेली छोटी दुकाने आहेत. वृद्ध लोकांसाठी पालखीप्रमाणे डोली उपलब्ध आहे. विशाळगडावर पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे स्वत: पाण्याची सोय करणे, हे कधीही उत्तम.

विशाळगाडवर राहण्यासाठी छोट्या-छोट्या खोल्या भाड्याने मिळतात. पण पाण्याअभावी गडावर अनेक पर्यटक राहत नाहीत. त्याऐवजी जाताना अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत, त्याठिकाणी राहणे पसंत करतात.

 

विशाळगडला दोन मार्गाने जाता येते -

१) पावनखिंड मार्गे - बांबवडे-मलकापूर-पांढरपाणी-भात तळी-गजापूर-पावनखिंड लागते. येथून काही किलोमीटर अंतरावर विशाळगडला जाता येते.

२) आंबा वाघझरा मार्गे - बांबवडे- शाहूवाडी-मलकापूर-आंबा-विशाळगडला जाता येते. मलकापुरातून विशाळगडला थेट रस्ता आहे.

विशाळगडमध्ये काय काय पाहाल?

खोकलाईदेवीचे मंदिर, विशाळगड किल्ला, राम मंदिर, अमृतेश्वर महादेव मंदिर, हजरत मलिक रेहान दर्गा (२ दर्गा आहेत), मुंडा दरवाजा, कोकण दरवाजा, अहिल्याबाई समाधी मंदिर, वाघजाई मंदिरे, वीर बाजीप्रभू देशपांडे समाधी, शिवकालीन लहान पूल, मारुती मंदिर, पाण्याच्या टाक्या, गडावर चार दरवाजा, नरसोबा मंदिर, तलाव, टकमक कडा, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी, दोन विहिरी (चौकोनी आणि अर्धचंद्राकार विहिर), पंत अमात्य यांच्या जुन्या राजवाड्याचे अवशेष.

 



जुन्या दर्गाजवळ एक मोठे पठार असून याठिकाणी सह्याद्रीच्या डोंगररांगा जवळून पाहता येतात. विशालकाय दरी आणि भिरभिरणारा वारा सर्वकाही सुखावह ठरणारे असते.


याठिकाणी हत्ती अन्‌ गायब झालेली वरात दगडी स्वरुपात डोंगरामध्ये वसलेली दिसते. 


गजापुरातून विशाळगडला जाताना कोकणी पद्धतीची कौलारु घरे, कुक्कुटपालन. शेळीपालन करणारे शेतकरी, कोकणी पद्धतीची नऊवारी साडी नेसलेल्या महिला, लाल माती अन् सभोवताली सह्याद्रीच्या डोंगररांगा असा निसर्गाचा पसारा दृष्टीत भरणारा आहे.

याठिकाणाला एकदा का होईना, नक्की भेट द्या.

काय खाल?

गडावर मात्र स्वत: जेवण बनवावे लागेल. प्यायचे पाणीदेखील याठिकाणी पैसे देऊन विकत घ्यावे लागते. उन्हाळ्यात रानमेवा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

 
काळी मैना, जांभूळ, काजुचे बोंड, फणस, चिकन्या, नेरली, जरदाळू, शिवाय तमालपत्री याठिकाणी भरपूर प्रमाणात सापडते. (तमालपत्रीची पाने मसाले भात करताना वापरली जातात)

पालेश्वर धरण आणि धबधबा -

मलकापुरातून ३ कि.मी. आतमध्ये हे धरण आणि धबधबा आहे. येथे पावसाळ्यात असंख्य पर्यटक पालेश्वर धबधब्याचा आनंद लुटतात.

कसे जाल?

कोल्हापूर-बांबवडे-मलकापूर बाजारपेठ. बाजारपेठेतून डावीकडे एक रस्ता गेला आहे जो पांढरेपाणी - पावनखिंड मार्गे विशाळगडला जातो. पांढरेपाणीच्या अलिकडे उजव्या बाजूला एक छोटा कच्चा रस्ता गेला आहे, जो पालेश्वर धरण आणि धब्याधब्याकडे जातो.

पावनखिंड आणि धबधबा -

पालेश्वरमधून बाहेर पडल्यानंतर पावनखिंडीकडे जाता येते. पांढरपाणी अशी त्याची मुख्यत: ओळख आहे. पावनखिंडीचे मुख्य प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे वर्तुळाकार दिसते. भगवा ध्वज इथे फडकताना दिसतो. इथे पार्किंगची सोय आहे.

पुढे गेल्यानंतर मोठा बुरुज दिसतो. या बुरुजावर सहजपणे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पुढे गेल्यानंतर इतिहासाची माहिती देणारे फलक इथे दिसतात.

पावनखिंडीत उतरण्यासाठी लोखंडी जिना[/caption]

बाजीप्रभूंना वीरमरण प्राप्त झाले, त्यामुळे ही जागा पवित्र झाली. अशा या पावनखिंडीत ढाल-तलवारी प्रतिक असलेले बाजीप्रभूंचे स्मृतीस्थान आहे.

लागूनचं मोठा धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होतो. तरुणांची इथे प्रचंड गर्दी असते.

हा धबधबा नयनरम्य असून धबधब्याच्या वरून प्रवाहित होणाऱ्या पाण्यात बसून आनंद लुटता येतो. इतरवेळी धबधबा आटला की, या खिंडीत उतरण्याची सोय आहे.

कोंबडी वडे[/caption]

अनेक ट्रेकर्स खिंडीतून ट्रेक करण्यासाठी याठिकाणी येत असतात.

बांगडा-मच्छि करी-चिंचेचा कोळ[/caption]

काय खाता येईल?

उन्हाळ्यात य़ाठिकाणी स्थानिक लोक मसाले ताक, कोकम , सरबत, कोकम फळे, करवंद, जांभूळ, चिकन्या, कलिंगड, चहाची विक्री करतात. तर पावसाळ्यात गरमागरम मक्याचे कणीस, मॅगी, मसाले चहा, भजी विकतात. किंवा तुम्ही घरचे जेवण आणून याठिकाणी बसून जेवलात तरी चालते. येथे ऐसपैस जागा आहे.

पावनखिंडीतील धबधबा[/caption]

कोकण दर्शन -

'कोकण दर्शन' या नावाने सह्याद्री सनसेट पॉईंट आहे. असंख्य पर्यटक याठिकाणी सुर्यास्त पाहण्यासाठी गाड्या थांबवून उपस्थिती लावतात. कोकणचे दर्शन याठिकाणाहून होते. सह्याद्रीच्या एका मागोमाग अनेक विशाल रांगा जवळून पाहता येतात.

दुसरा मार्ग आहे - आंबा घाटातून. आंबा गावातून पुढे गेल्यानंतर वाघझरा हे ठिकाण विश्रांतीसाठी उत्तम ठिकाण आहे. (कोकणात जाणाऱ्यांसाठी आंबा घाटाची सुरुवात याठिकाणापासून होते) वाघझरा येथे पर्यटकांना विश्रांतीसाठी सोय केली आहे. वाघझऱ्यातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत, जिथे जंगलाची सुरुवात होते. इथे एक गोड्या पाण्याची विहिर बांधण्यात आली आहे. पूर्वी याठिकाणी खुले तळे होते.

विशाळगडावरील तोफेचे अवशेष

मानोली धरण -

आंब्यातून पुढे आल्यानंतर मानोलीचे धरण दृष्टीस पडते. या धरणापर्यंत गाडीने जाता येते. पावसाळ्यात हे धरण भरल्यानंतर खळखळ वाहणारे पाणी, सभोवतालचा सुंदर परिसर अनुभवता येतो. मानोली धरणाच्या साचलेल्या पाण्यात बोटिंग रायडिंगची सोयदेखील आहे. मानोलीतून पुढे गेल्यानंतर एक रस्ता विशाळगडाकडे गेला आहे.

पंत अमात्य राजवाडा 

ट्रीपचा अवधी वाढवला तर बर्कीचा धबधबा देखील पाहता येईल. या धबधब्याला जाण्यासाठी जंगलातून पायवाट असून थोडे चालावे लागते. कोकणात जाणाऱ्यांसाठी पावनखिंडीतून अणुस्कुरा घाटा मार्गे जाता येईल. या मार्गावरून राजापूरला जाण्यासाठी रस्ता आहे.

विशाळगडावरील चौकोनी आकाराची विहिर[/caption]

जाण्यासाठीची योग्य वेळ -

वरील सर्व ठिकाणी १२ ही महिने जाऊ शकता. उन्हाळ्यात मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी कुटुंबासह जाऊ शकता.

पावसाळ्यात याठिकाणी धो-धो पाऊस पडतो. हा पाऊस जर अनुभवायचा असेल तर नक्की जा! पण, पावसाळ्यानंतर याठिकाणी जाणे स्वर्गाहून कमी नाहीये. हिरव्यागार धरतीने ओढलेली धुक्याची चादर, पडणाऱ्या हलक्या सरी, हवेतील गारवा आणि ओलेचिंब झाडांवरून पडणारे टपटप पाणी, भिजलेल्या रस्त्यावरून प्रवास अनुभवणे हे भाग्यात असावे लागते. हिवाळ्यात विशाळगड पाहणे, डोळ्याचे पारणे फेडणारे ठरते.

अमृतेश्वर महादेव मंदिर 

ट्रेकिंग -

तुम्ही जर ट्रेकर्स असाल तर तुम्हाला पन्हाळा - पावनखिंड ट्रेकिंग करता येते.

सह्याद्रीच्या रांगा[/caption]

आंबा फाट्यावर अनेक दुकाने आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. येथून तुम्ही कोरडा खाऊ विकत घेऊ शकता अथवा अनेक चांगले हॉटेल्स असल्यामुळे याठिकाणी जेवणदेखील करू शकता.


Wednesday, April 24, 2024

Goa Panjim Beautiful Shri Maruti Temple : गोव्यात गेला की 'हे' अप्रतिम मारुती मंदिर पाहायला विसरु नका


असे मंदिर शोधूनही सापडणार नाही; गोव्यात गेला की नक्की भेट द्या 

उत्तर गोव्यातील श्री मारुती मंदिर अप्रतिम तर आहेच, शिवाय, त्याच्या स्थापत्यशैलीमुळे मंदिराने वेगळी ओळख निर्माण केलीय. मारुती वा हनुमानाचे मंदिराची रचना प्रादेशिकरित्या बदलत जाते. गोव्यातही या मंदिराची रचना आगळी वेगळी आहे. नेहमीच्या मंदिरासारखी आपणास ती दिसत नाहीत. 

अल्टिन्हो नावाच्या डोंगरावर हे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य डोंगराच्या तीन कप्प्यांमध्ये हे मंदिर विस्तारलेले आहे. मंदिराजवळ पोहोचल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला मंदिराकडे जाणाऱ्या असंख्य पायऱ्या दिसतील. पायथ्यालाचं असे वाटेल की, हा डोंगर चढून मंदिरात जावे लागते की की काय? पण, या डोंगरातूनचं रस्ता पुढे गेला आहे, जिथे चारचाकी आणि दुचाकी घेऊन जाता येते. अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडीने पोहोचता येतं. 

भगवान हनुमानला इष्टदेवच्या रूपात स्थापित करण्यात आला आहे. रात्रीचे हे मंदिर विद्युत रोषणाईमुळे दैदिप्यमान ठरते. दूरवरूनदेखील हे मंदिर झगमगते दिसते. 

सायंकाळी ७-८ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुले असते. पांढरा, भगवा, लाल आणि पिवळ्या रंगांनी सजवलेले मंदिर पाहणाऱ्यांना आकर्षित करते. परदेशी पर्यटक तर याठिकाणी आवर्जून भेट देतात. 

मंदिरात जाण्यासाठीचे नियम -

अनेक मंदिरांप्रमाणेच या मंदिरात जाण्यासाठी कपड्यांसंबंधित काही नियम लागू करण्यात आले आहे. पुरुषांना फाटकी जीन्स, बरमोडा किंवा थ्री-फोर्थ पँट घालून जाणे बंदी आहे तर महिलांना शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट ड्रेस, शॉर्ट मिनी ड्रेस घालून मंदिरात प्रवेश करता येत नाही. यासाठी मंदिरात एका बॉक्समध्ये वस्त्र ठेवले आहेत, जे परिधान करून तुम्ही मंदिरात जाऊ शकता. शिवाय मंदिर खूप मोठे असून, पाहण्यासारखे आहे. बाहेर किती ऊन असले तरी मंदिरात प्रवेश केल्यानंतर थंड वातावरणाची अनुभूती येते. 

अगरबत्ती आणि धूपचा दरवळणारा गंध धार्मिक वलय तयार करते. अष्टकोनी दीस्तंभ आणि लॅम्प टॉवर येथील आकर्षण आहे. मुख्य रस्त्यावरून हे मंदिर डोंगराच्या तीन स्तरांमध्ये वसलेले खूप सुंदर दिसते. दर्शन घेऊन मंदिर पाहण्यासाठी १ तासाचा वेळ पुरेसा ठरतो. 


श्री मारुती मंदिराकडे जाण्यासाठीचे अंतर - 

पणजी-कदंब बस स्टँडपासून ३.३ किमी. 

म्हापसापासून १७ किमी.

वास्को रेल्वे स्टेशनपासून २८ किमी.

श्री मारुति संस्थान असलेले हे मंदिराची सुंदर वास्तुकला यापूर्वी तुम्ही कधीही पाहिली नसेल. पावसाळ्यात या मंदिराच्या डोंगरावरूनच छोटे-छोटे झरे प्रवाहित होऊन खाली येतात. 

येथे १० दिवसांचा मोठा वार्षिक उत्सव असतो. खूप दूरवरून पर्यंटक याठिकाणी भेट द्यायला येतात. तर भाविकांची नेहमीच गर्दी असलेले ठिकाण आहे. 

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात अगरबत्ती, फुले, तेल, काळी उडीद, मीठ, रुईची पाने, फुलांचे हार, विक्री करण्यासाठी स्थानिक लोकांची छोटी-छोटी दुकाने आहेत. 

या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर डोंगरावरून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा पोर्तुगीज वास्तुकला रचना असणारी असंख्य घरे देखील नजरेस पडतात. काही पर्यटक याठिकाणी फोटोशूट करण्यासाठी आवर्जून थांबतात.   

पणजीमध्ये आणखी पाहण्यासारखी सुंदर मंदिरे - 

 श्री आप्तेश्वर गणपति मंदिर, महालक्ष्मी मंदिर, श्री साईं बाबा मंदिर, श्री सती मंदिर 

tags -  Goa Panjim Beautiful Shri Maruti Temple, best temples in Goa, best temples in panjim, hindu temples in Goa, Goa tourism, Goa best places, Goa palces, panjim tourist places, panjim temples, hanuman jayanti 2024, hanuman jayanti , hanuman temple , maruti temple, maruti temples in panjim, panjim maruti sansthan , panjim maruti mandir, shri maruti sansthan , panjim, गोवा मंदिरे , उत्तर गोव्यातील श्री मारुती मंदिर , श्री मारुती मंदिर , श्री मारुती संस्थान, अल्टिन्हो डोंगर, भगवान हनुमान मंदिर , हनुमान टेम्पल


Thursday, April 4, 2024

Mahabaleshwar Explore : महाबळेश्वरला जाताना 'ही' ठिकाणेही नक्की पाहा!


भिलार (ता. महाबळेश्वर) हे केवळ स्ट्रॉबेरीचे गाव म्हणूनचं नाही तर पुस्तकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. याठिकाणी सोलो ट्रीप किंवा फॅमिलसहित जाता येईल. खरंतर बच्चे कंपनीला भिलार हे गाव नक्की दाखवा. 

भिलार हे निसर्गसंपन्न गाव आहे. भिलार गावातील प्रत्येक घरात काही ना काही साहित्य हे तुम्हाला पाहायला मिळणारचं. शिवाय येथून काही अंतरावर लिंगमळा धबधबा आहे, जिथे तुम्ही पावसाळ्यामध्ये भेट देऊ शकता. 

महाबळेश्वरला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट दिला तर तो तुम्हाला धुक्याच्या चादरीमध्ये लपटलेला दिसेल. वाई, धोम धरण, ठोसेघर धबधबा पाहत वृक्षराजींनी वेढलेला निसर्ग, पसरणी घाट ओलांडून हलक्या हलक्या सरी झेलत महाबळेश्वरची सैर करणं, स्वर्गाहून कमी सुख नाही. 

(Mahabaleshwar Explore) हिरव्यागार वेढलेल्या धरतीवर दाडून आलेले काळे मेघ अन्‌ रिमझिम पाऊसधारा, ओलेचिंब झाडे, अंगावर शहारे आणणारा गारवा असा सुंदर प्रवास तुम्हाला याठिकाणी अनुभवता येईल. (Mahabaleshwar Explore)

पाचगणीपासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर पाचगणी ते महाबळेश्वर अंतरावर भिलार हे गाव आहे. गाव तसं सुंदर. 

अनेक माहिती फलकांना आणि सुंदर चित्रांनी रेखाटलेल्या घरांच्या भिंती तुमचे स्वागत करतात. जाता जाता स्ट्रॉबेरी शेती आणि रंगबेरंगी फुलांची झाडे पटकन लक्ष वेधून घेतात.

शहरातील इमारतींप्रमाणे येथील सुंदर इमारती दिमाखात उभ्या असलेल्या दिसतात.

घरांचे ग्रंथालय

भिलारमध्ये पुस्तकांचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र सरकारने साकारली आहे.

लोकसाहित्य, कथा, क्रीडा व विविध लोकप्रिय, कविता, कादंबरी, ग्रामीण कथा, चरित्रे, आत्मचरित्रे, निसर्ग, पर्यावरण, भटकंती, बोलकी पुस्तके व प्रकल्प कार्यालय, महाराष्ट्र प्रदेश, मराठी व संस्कृती, विज्ञान, परिवर्तन चळवळ, समाजसुधारक व सुधारणांचा इतिहास, ललित गद्य आणि वैचारिक पुस्तके, बालसाहित्य, दिवाळी अंक, नाटक व चित्रपट, चित्रमय पुस्तके, स्पर्धा परीक्षा, नियतकालिके व साहित्यिक माहितीफलक, इतिहास, विनोदी, छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले, वर्तमानपत्रे व साप्ताहिके, स्त्री साहित्य, संत साहित्य, विविध कलांविषयक, साहित्यिक माहितीफलक.

ही वरील सर्व साहित्य तुम्हाला भिलारमधील नागरिकांच्या घरांमध्ये अगदी मोफत वाचायला मिळते. घरांच्या पहिल्या खोलीत अनेक साहित्य संपदा, पुस्तके पर्यटकांना अगदी मोफत वाचण्यासाठी ठेवलेली आहेत.

तुम्ही याठिकाणी बसून तुम्हाला हवी ती पुस्तके वाचू शकता. १५ ते १७ हजारांच्या जवळपास विविध साहित्य याठिकाणी उपलब्ध आहे.

प्रत्येक घरात ३०० ते ४०० पुस्तके पाहायला मिळतील. कोणीही वाचक तिथे गेला की हवं ते पुस्तक घेऊन वाचू शकतो. वाचायला बसण्यासाठी काही खास जागा तयार केल्या आहेत. 

समोर पाचगणीचा टेबललँड निदर्शनास पडतो. (Mahabaleshwar Explore)

आणखी कुठे भेट द्याल?

मॅप्रो गार्डन, स्ट्रॉबेरी शेती, धुक्यात हरवलेले महाबळेश्वर-पाचगणी, लिंगमळा धबधबा, ठोसेघर धबधबा, सह्याद्रीच्या डोंगरातील भिलार धबधबा.

काय खाल?

स्ट्रॉबेरी, लोणी डोसा, लिची, पेरू, सर्व मोसमी फळे, शाकाहारी, मांसाहारी जेवण.

भिलार येथे कसे जाल?

कोल्हापूर-सातारा (बेंगळुरु – पुणे महामार्गावरील) पाचवड फाटा-वाई-पाचगणी-भोसे खिंड-भिलार
मुंबई पुणे (पुणे – बेंगळुरु महामार्गावरील) सुरुर फाटा-वाई-पाचगणी- भोसे खिंड- भिलार
मुंबई (मुंबई-गोवा महामार्गावरील) पोलादपूर-महाबळेश्वर-भोसे खिंड- भिलार

लिंगमळा धबधबा –

महाबळेश्वरमधील सर्वात उंच धबधबा म्हणून लिंगमळा यास ओळखले जाते. महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधब्याला एकदा का होईना, भेट द्याच! वर्षा पर्यटनासाठी लिंगमळा परिसर उत्तम आहे. 

अनेक पर्यटक खास लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी दूरवरून येत असतात.

या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहणे, आवाज करत कोसळणारा फेसाळलेला लिंगमळापर्यंत जाण्यासाठी थोडे चालत जावे लागते. लिंगमळा धबधबाला जाण्यासाठी जंगलातून टू व्हिलर आणि फोर व्हिलर गाड्या घेऊन जाता येतं.

पार्किंग करून तेथून एक ते दीड किलोमीटर पायऱ्या उतराव्या लागतात. हा परिसर जंगलाचा असून धबधब्याच्य़ा कडेने संरक्षक कठडे उभारलेले आहेत. पायऱ्यांवरून सहजरित्या तुम्ही धबधबापर्यंत पोहोचू शकता. याठिकाणी जाणयासाठी किरकोळ प्रवेश शुल्क आकारले जाते. (Mahabaleshwar Explore)

महाबळेश्वर

थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ख्याती आहे. येथे सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक अक्षरश: मांडी घालून बसतात. गरमागरम भजी, चहा. मक्याचे कणीस अशा पदार्थांचा आस्वाद घेत मनमोहक रांगा, सूर्याचे दर्शन, घोडेस्वारी, अनेक बगीचे, हिरव्यागार निसर्गाचा सैरसपाटा म्हणजे क्या बात है!


महाबळेश्वरला का पाहाल?

आर्थर सीट पॉईंट, इको पॉईटं, वेण्णा लेक (बोट रायडिंगसाठी प्रसिद्ध), बॉम्बे पॉईटं, फॉकलँड पॉईंट, महाबळेश्वर मार्केट.

महाबळेश्वरमध्ये काय खाल?

चहा-कॉफी, मसाले दूध, गरम भजी, मक्याचे कणीस. मध, जाम, जेली, रासबेरी, स्ट्रॉबेरी, इतर खाद्यपदार्थ.

श्री क्षेत्र महाबळेश्वर

महाबळेश्वर येथून ५ किमी अंतरावर श्री क्षेत्र महाबळेश्वर आहे. येथे जुने कृष्णाबाई मंदिर आहे. शिवाय अनेक धार्मिक स्थळे याठिकाणी पाहता येईल.

महाबळेश्वरला कसे जाल?

पुणे पासून १२१ किमी
मुंबईपासून २७१ किमी
सातारा शहरापासून ५६ किमी
कोल्हापूरपासून १७८ किमी








Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...