Tuesday, February 25, 2025

Mahashivratri 2025 Marleshwar Temple | गर्द गुहेतील 'मार्लेश्वर'


मार्लेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील एक धार्मिक स्थान आहे. येथील डोंगररांगेतील एक गुहेत मार्लेश्वर हे प्रसिद्ध शिव मंदिर आहे. नागांचे वास्तव्य असलेले स्थान अशी त्याची ख्याती आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मार्लेश्वरचा धबधबा. याठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. मार्लेश्वर हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं ठिकाण आहे. भर पावसात देखील याठिकाणी खूप भाविक अन्‌ पर्यटक येतात. मार्लेश्वरचे मंदिरच नाही तर येथील धबधबा देखील विलोभनीय आहे. मार्लेश्वरचे मंदिर गर्द गुहेत असल्याने भाविक इथे आवर्जून जातात. 


मार्लेश्वर मंदिर 

मार्लेश्वर एक प्राचीन मंदिर असून भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिराची ख्याती म्हणजे संपूर्ण मंदिर एका गुहेत आहे. दुसरी खासियत म्हणजे गुहेत दीप, समईचाच उजेड असतो. गुहेत वाईट लावली जात नाही. मारळमधून पुढे जाताना आजूबाजूला हिरवीगार झाडी निदर्शनास पडते. मार्लेश्वरची मुख्य कमान असून प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर काही अंतरावर पार्किंगची सोय आहे. अगदी प्रवेशद्वारापासूनच हार, फुले, खेळण्यांची वेगवेगळी दुकाने पाहायला मिळतात. अन्नपदार्थ आणि विविध वस्तूंचे स्टॉल्स दिसतात. मार्लेश्वरच्या गुहेपर्यंत जाण्यासाठी तब्बल ५२० पायऱ्या चढाव्या लागतात. सिमेंट आणि दगडी पायऱ्यांवरून सहजतेने मंदिरापर्यंत पोहोचता येते. पायऱ्यांवरून जात असताना डोंगर कपारावरून खळखळून वाहणारे पाणी मोहून टाकते. इथे विविध पक्षी आणि माकडांचा वावर अधिक असतो. पायऱ्यांवरून जाताना उंच डोंगरांचे विलोभनीय दृश्य नजरेस दिसते. 


डोंगरातचं ही गुहा असून गर्द काळोखातील हे महादेवाचे मंदिर मनाला शांती देणारे आहे. गुहेत जाण्यासाठी एका छोट्या दरवाज्यातून एकच व्यक्ती आतमध्ये जाऊ शकते. गुहा मात्र पाच-दहा माणसे बसू शकतील, इतकी मोठी आहे. गुहेत गेल्यानंतर महादेवाची पिंड असून आजूबाजूला खूप साऱ्या पितळेच्या नागाच्या मूर्ती दिसतात. काही अन्य देवदेवतांची दगडी शिल्पे आहेत. गुहेस लाईट कधीच लावली जात नाही. २४ तास इथे समई, दिवे लावले जातात. एक वेगळाच अनुभव तुम्हाला याठिकाणी मिळेल. 


मार्लेश्वर धबधबा - 

पावसाळ्यामध्ये हा धबधबा प्रवाहित होतो. लक्षवेधी मार्लेश्वरच्या धबधब्याचे रौद्र रुप पावसाळ्यात पाहता येते. कुटुंबासह जाणार असाल तर पावसाळ्यानंतर जावे. तेव्हा धबधब्यापर्यंत पोहोचता येते. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी १२-१५ मिनिटे छोटे-मोठे दगड चढावे लागतात. पण धबधब्याजवळ पोहोचताच निळेशार नितळ पाणी तुमचे स्वागत करायला तयार असते. धबधब्याच्या पाण्यात उतरताही येते. परिवारासह तुम्ही या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

कसे जाल मार्लेश्वरला?

कोल्हापूर-वाघबीळ-शाहूवाडी-मलकापूर-वारुळ-आंबा घाटातून जाताना उजवीकडे एक छोटेसे मंदिर आहे..त्याला लागून एक कच्चा रस्ता जातो, जो मार्लेश्वर मंदिराजवळ जाणारा आहे.

दुसरा रस्ता -

कोल्हापूर-वाघबीळ-शाहूवाडी-मलकापूर-वारुळ-आंबा घाट उतरल्यानंतर देवरुखमधून मारळ या गावातून जावे लागते.


काय खाल?

मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच अनेक दुकाने तुम्हाला पाहायला मिळतील. शोभेच्या वस्तू, खेळणीची दुकाने, लाकडी खेळणी, सौंदर्य प्रसाधने, कोकम, लस्सी, ताक, लिंबू सरबतची अनेक दुकाने आहेत. ताजी कोकम फळांची चव इथे चाखायला मिळते. तांदळाच्या उकडी मोदकावर साजूक तुपाची सोडलेली धार तोंडाला पाणी सुटणारी आहे. शुद्ध शाकाहारी आणि सात्विक जेवणाच्या थाळीत तांदळाची भाकरी, झुणका, पापड, लोणचे, भात, सोलकढी, भाज्या, भरलेले वांगे असे पदार्थ मिळतात.  



आणखी काय पाहाल?

आंगवलीतील मंदिर - श्री देव मार्लेश्वर हे जुने मंदिर असून पाहण्यासारखे आहे.


सोमेश्वर मंदिर, राजवाडी - देवरुख-संगमेश्वर-धामणी-राजवाडी अशा मार्गाने या गावात पोहोचता येते. तर चिपळूणहून संगमेश्वरकडे जात असताना राजवाडी येथे महामार्गापासून आत जवळ असलेले हे मंदिर आहे. शास्त्री नदी पूल आरवली क्रॉस करून पुढे गेला की एक गरम पाण्याचे कुंड आहे. पुढे एक भग्न मंदिर आणि तिथं गरम पाण्याचे आणखी एक कुंड आहे. तेथून पुढे साधारण ३ किमी अंतरावर सोमेश्वर राजवाडीचा फाटा (ता. संगमेश्वर) आहे. राजवाडी गावात एक सुंदर मंदिर आहे! घनदाट झाडीत वसलेले सोमेश्वर मंदिर हे दोन गाभाऱ्यांमुळे खास ठरते. खालच्या गाभाऱ्यात सोमेश्वर महादेव, तर वरच्या गाभाऱ्यात नागधारण गणेशाची मूर्ती आहे. राजवाडी परिसरात गरम पाण्याची कुंडे आहेत. तुरळ येथेही गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. 


कर्णेश्वर मंदिर - रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर याठिकाणी कर्णेश्वराचे प्राचीन मंदिर असून ते पाहण्यासारखे आहे. कसबा पेठ येथील सरदेसाई वाडा, छत्रपती संभाजी महाराज स्मारक स्थळ, सप्तेश्वर मंदिर अशी ठिकाणे पाहता येतील.  



https://pudhari.news/maharashtra/kokan/ratnagiri/mahashivratri-2025-ratnagiri-temple-marleshwar



Mahashivratri 2025 : साऊथलाच नव्हे तर कोल्हापुरातही आहे असे मंदिर स्थापत्यशैलीचे अद्भूत मंदिर


कोल्हापुरातील या मंदिरात एकाच गाभाऱ्यात पुजले जाते 'कोपेश्‍वर' अन् 'धोपेश्‍वर'


कोल्हापुरच्या शिरोळ तालुक्यात असे एक मंदिर आहे, जे पाहिल्यानंतर तुम्हाला साऊथच्या मंदिराची आठवण नक्कीच येईल. अद्भूत स्थापत्यशैलीचा नमूना असलेल्या या मंदिरात एकाच गाभाऱ्यात  शिवशंकर आणि श्रीविष्णू यांची पूजा केली जाते. या मंदिराते केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर वैज्ञानिक दृष्टीकोनही महत्त्वाचा आहे. याचे उत्तम उदाहरण त्रिपुरारी पौर्णिमेला पाहता येते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वर्गमंडपाच्या बरोबर मधोमध चंद्र येतो. हा नजारा वर्षातून एकदाच पाहायला मिळतो. हे मंदिर आहे 'कोपेश्वर'. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावामध्ये साध्या दगडी कमानीतून आत गेल्या भव्य असं हे मंदिर आहे. 


कोपेश्‍वर मंदिराला केंद्रीय पुरातत्‍व विभागाने २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रीय संरक्षित स्‍मारक म्‍हणून घोषित केले. कोपेश्‍वर मंदिर अप्रतिम स्‍थापत्‍यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. बेसॉल्‍ट आणि ग्‍लास पॉलिशिंग केल्‍याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. पावसाळ्‍यात ऊबदारपणा आणि उन्‍हाळ्‍यात गारवा टिकून राहावा, त्‍यादृष्‍टीने तत्‍कालीन स्‍थापत्‍य विशारदांनी केलेला प्रयत्‍न येथे दिसून येतो. या मंदिराचे वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे सुंदर गजपट्‍ट (मंदिर सभोवताली हत्तींच्या मूर्तीची शिल्पे) असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. उत्‍कृष्‍ट शिल्‍पकलेचा अविष्‍कार पाहता अनेकजण या मंदिराची तुलना खजुराहोच्‍या मंदिराशी केली जाते. या स्‍थानाचे मूळ नाव कोप्‍पम किंवा कोप्‍पद होते. पण, मोगल सरदार खिद्रखान मोकाशीने कोप्‍पम जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या नावावरून खिद्रापूर असे नाव त्‍याला मिळाले. येवूर (जि. विजापूर) येथील शिलालेखात कोपेश्‍वराचा उल्‍लेख मिळतो. तसेच एका ताम्रपटातही या मंदिराचा उल्‍लेख सापडतो.


कोपेश्वर मंदिरात आहेत दोन शिवलिंग

या मंदिराच्या गाभार्‍यात कोपेश्‍वर (महेश) आणि धोपेश्‍वर (विष्‍णू) अशी दोन शिवलिंगे आहेत. याला लागूनच सभामंडप आहे. सभामंडपावर सहा दगडी गवाक्ष असून हे वैशिष्‍ट्‍य असणारे हे असे एकमेव मंदिर आहे. दुसरे वैशिष्‍ट्य म्हणजे या मंदिरात नंदी नाही. मंदिराचे वेगळेपण म्‍हणजे स्‍वर्गमंडपाची रचना. या मंडपाबाहेर २४ हत्तींची मूळ रचना होती. पैकी ११ हत्ती येथे पाहावयास मिळतात. ४ प्रवेशद्‍वार आणि ४८ खांबांवर हे मंदिर उभारलेले असून मंदिराच्‍या दर्शनी भागात आकाशाच्‍या दिशेने १३ फूट व्‍यासाचे गवाक्ष आहे. त्‍याच मापाची खाली रंगशिला (चंद्रशीला) (गोलाकार दगडासारखी) असून त्‍याभोवती १२ खांब वर्तुळाकृती आढळतात. मंदिरावर नर्तिका, वादक, लेखिका, शस्‍त्रधारी द्‍वारपाल, सप्‍तमातृकांच्‍या प्रतिमा आहेत. यावरून, तत्‍कालीन समाजातील स्‍त्रियांना असणारे उच्‍च स्‍थान समजते.  


खिद्रापूर मंदिर परिसरात १२ शिलालेख

मंदिर परिसरात १२ शिलालेख असून त्‍यातील ८ शिलालेख कन्‍नड भाषेतील आहेत. त्‍यापैकी एक संस्‍कृतमध्‍ये, दुसरा देवनागरीत आहे. पहिला शिलालेख नगारखान्‍याच्‍या दक्षिण बाजूच्‍या विरगळावर जुन्‍या कन्‍नड भाषेत लिहिलेला आहे. आणखी एका शिलालेखात कोपश्‍वराची स्‍थिती, कुसुमेश्‍वर, कुटकेश्‍वर या नावांचा उल्‍लेख येतो. 


खिद्रापूर मंदिरावर दक्षिण स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव

मंदिरात प्रवेश करताना नगारखाना, स्‍वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ, गाभारा असे बांधकाम दिसते. मंदिराच्‍या पायथ्‍याशी खुरशिला, गजपट्‍ट त्‍यावर नरपट्‍ट आणि त्‍यावरील देवकोष्‍ट (चौकट असल्‍यासारखे) आणि नक्षीकाम अशी रचना दिसते. मंदिरावरील भवानी, काळभैरव, विष्‍णू, ब्रम्‍हदेव, चामुंडी, गणपतीची मूर्ती ही हिंदू देवदेवता, पंचतंत्रातील कथा तर उत्तरेच्‍या बाजूस घंटा वादिका, अहिनकुल (साप-मुंगुस), मिथून शिल्‍प आदी शिल्‍पे जैन मंदिराची वैशिष्‍ट्‍ये दशर्वणारी आहेत. मंदिराचे शिखर गोपुरासारखे  असल्‍याने दक्षिणेतील स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव दिसतो. 


मंदिरात आढळते आखाती शिल्‍प 

मंदिरावर इराणी किंवा आखाती व्‍यक्‍तीचे शिल्‍प आहे. इराणचा बादशहा  दुसरा खुस्रो याने राजदुतामार्फत चालुक्‍य दरबारी नजराणा पाठवला होता. यावरून, चालुक्‍यांचे इराणशी संबंध होते, असे दिसते. या भेटीचे प्रतिक म्हणून त्‍या इराणी राजदुताचे शिल्‍प कोरले असावे, असे जाणकार सांगतात. 

सप्‍टेंबर, १७०२ मध्‍ये मोगल बादशाह औरंगजेबने केलेल्‍या आक्रमणात येथील मूर्तींची मोडतोड केली होती. तरीही या मंदिराचे बांधकाम इतके उत्तम आहे की, २००५ साली आलेल्‍या महापुरातदेखील मंदिर सुस्‍थितीत राहिले. 


धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास

आज खिद्रापूर धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास येत आहे. पुजेसाठी हार-फुले, अगरबत्ती, पेढे विक्री करण्यासाठी किरकोळ व्यावसाईक मंदिराबाहेर असतात. परिसरात आता जेव‍ण-खाण्याची सोय होत आहे. मंदिराबाहेर, मसाले ताक, कोकम, सरबत, चिकू, पेरु, केळी, बोर यासारखे फळविक्रेते असतात. शिवाय, चिरमुरे, शेंगदाणे, वाटाणेसारखा हलके-फुलके स्नॅक देखील मिळते.   

त्रिपुरारी पौर्णिमेला रंगतो उत्सव 

त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिलेला व्यापणारा चंद्रप्रकाशाचा उजेड  रात्री भाविकांना याची देही, याची डोळा पाहता येतो. याचदिवशी खिद्रापुरातील कोपेश्वराची यथायोग्य विधीवत पूजा केली जाते. येथील महाआरती खास असते. संध्याकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव, त्रिपुरा प्रज्वलन केले जाते. भजन, कीर्तन, नृत्याविष्कार असा उत्सव फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा केला जातो. 


खिद्रापूरला जाण्‍याचा मार्ग 

खिद्रापूरला जाताना ग्रामीण भागातून जावे लागते. पुढे रस्त्यांच्या दोन्ही बाजूला हिरवेगार शेत-शिवार आहे. 

एसटीने पुढील तीन मार्गाने खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर) येथे जाता येते. 

हातकणंगले-शिरोळ-नृसिंहवाडी-कुरुंदवाड-अकिवाट-खिद्रापूर

कोल्‍हापूर-इचलकरंजी-कुरूंदवाड-अकिवाट-खिद्रापूर 

 कोल्‍हापूर-हुपरी-रेंदाळ-बोरगाव-दत्तवाड-सैनिक टाकळी-खिद्रापूर

आणखी काय पाहाल? 

नृसिंहवाडी - नरसोबाची वाडी येथील दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रभरातून लोक इथे दर्शनाला येतात. पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम याठिकाणी होतो. कृष्णा नदी पुढे वाहत कर्नाटकात जाते. येथील वाडीची बासुंदी प्रसिद्ध आहे. 


सर सेनापती संताजी घोरपडे समाधी - नरसोबाची वाडी मंदिरापासून काही अंतरावर सर सेनापती संताजी घोरपडे समाधीस्थळ आहे. याठिकाणी एक वाड्याची मोठी वास्तू असून समोर कृष्णा नदी वाहताना दिसते. 


https://pudhari.news/maharashtra/kolhapur/mahashivratri-2025-kolhapur-remarkable-architecture-khidrapur-kopeshwar-temple


Thursday, February 20, 2025

Ankita Walavalkar Wedding Place | अंकिता वालावलकरने ज्या मंदिरात केले लग्न, ते गाव आहे इतकं सुंदर, मग जाताय ना?

अभिनेत्री अंकितालाही भूरळ पडणाऱ्या या गावात तुम्हालाही जायचं आहे का? 

बिग बॉस मराठी ५ फेम अंकिता वालावलकरने म्युझिक डायरेक्टर कुणाल भगतशी विवाह केला. दोघांचे लग्न १६ फेब्रुवारीला कोकणात पार पडले.  कोकणातील एका मंदिरात तिने लग्नसोहळ्याचे विधी केले. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये ज्या मंदिरात त्यांचा लग्नसोहळा झाला, ते मंदिर खूप सुंदर तर आहेच शिवाय गावदेखील तितकचं निसर्गरम्य आणि हिरव्यागार गर्द झाडीने नटलेले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल या गावात हे लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. या मंदिरात अंकिता-कुणालचा विवाहसोहळा पार पडला. वालावल गाव आणि लक्ष्मी-नारायण या मुख्य मंदिराविषयी तुम्हाला माहितीये का? कोकण फिरताना या वालावल गावात तुम्ही नक्की जा! कोकणाच्या सौंदर्याची आणखी एक बाजू तुम्हाला अनुभवता येईल. 




सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'वालावल' हे खूप सुंदर आणि गर्द झाडीने वेढलेलं ठिकाण आहे. वेंगुर्ल्यापासून हे अंतर जवळ आहे. एका दिवसाच्या किंवा दोन दिवसांचा ट्रीप प्लॅनदेखील तुम्ही करू शकता. वालावल माडांच्या बनांनी वेढलेला हिरवागार रस्ता कोकणात आल्याचं फिल अप्रतिम देतो. केळी, सुपारीच्या बागा, पोफळी आणि बांबूची सभोवतालने जंगल आणि शांतता अशी वालावलची खासियत. 


कर्ली नदीतील कांदळवनाची सफर  –

ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक पश्चिम वाहिनी नदी असून तारकर्ली येथे अरबी समुद्रास मिळते. वालावलमध्येच कर्ली नदी आहे. या नदीचे पाणी जानेवारी ते जूनपर्यंत खारे होते. पावसाळ्यात जुलैपासून डिसेंबर पर्यंत नदीचे गोड पाणी होते. कुडाळ तालुका आणि मालवण तालुका यांना अलग करणाऱ्या कर्ली नदीचा परिसर असंख्य हिरवेगार झाडे, विविध वनस्पती, फुले, पक्षांनी समृद्ध आहे. या नदीमध्ये जर तुम्हा सफर करायला मिळाली तर? व्वा! क्या बात है. मग नक्कीच वालावलच्या कर्ली नदीची होडी सफर तुम्ही अनुभवा. नावाडी काही अंतरावर मोटारीने आणि नंतर वल्हे हाकत नदीची सफर घडवून आणतो. एका बाजूला खारफुटी, कांदळवन तर दुसऱ्या बाजूला अगणित पक्षी पाण्यात डोकावून पाहताना तुम्हाला दिसतील. १०० ते २०० रुपयांमध्ये होडीचा नदीतील प्रवास अनुभवता येतो. 


अंकिताने ज्या मंदिरात लग्न केलं ते लक्ष्मीनारायण मंदिर –

वालावल हे गाव घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. अशा निसर्गातील एक सुंदर ठिकाण म्हणजे लक्ष्मीनारायणाचे प्राचीन मंदिर. मंदिराच्या आसपासचे निसर्गदृश्य व शांतीमय वातावरण पर्यटकोंसाठी एक आकर्षण ठरते. हे ठिकाण भक्तांसोबतच निसर्ग प्रेमींसाठी देखील एक सुंदर स्थल आहे. सूर्यभान आणि चंद्रभान प्रभु-देसाई बंधूंनी १४ व्या शतकाच्या सुरुवातीला हे पूर्वमुखी मंदिर बांधले गेल्याचे म्हटले जाते. हे मंदिर सुख समृद्धी आणि वैभवाचे प्रतिक मानले जाते. मंदिराला लागून एक मोठे तलाव आहे, जे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. त्यास लक्ष्मी नारायण तळे म्हटले जाते. कमळांनी फुललेले हे तलाव आहे. मंदिर परिसारत रवळनाथ मंदिर, घोडसदेव मंदिरे आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार इतके सुंदर आहे की, पाहणाऱ्यांचे पाय आपसुकचं मंदिराकडे वळतात.


प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर समोरचं तीन सुंदर आणि उंच दीपमाळा आहेत. मंदिराची वास्तुकला हेमांडपंथी आहे. मंदिरासमोर लागून एक हॉल आहे, जिथे दशवतार, कीर्तन आणि भजन गायले जाते. मंदिरातील अनेक कलाकुसर सागवान लाकडापासून केलेले आहे.


काळ्या पाषाणावरील अगदी बारीक कलाकुसर, रामायणातील दृश्ये, अप्सरा, गणपती, शंकर-पार्वती, नर्तकी, वाद्ये वाजवणाऱ्या नर्तिका, शस्त्रे, युद्धातील प्रसंग, शस्त्रे चालवणाऱ्या स्त्रिया, पक्षी, फुले अशा अनेकविध गोष्टी विविध खांबांवर कोरलेले आहे. रामनवमीला येथे मोठा उत्सव असतो. मंदिराच्या छतावर देखील कोरीव काम केलेले आहे. मुख्य दरवाजा कमी उंचीचा असून त्यावर कमळाच्या फुलांचे कोरीव काम आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला म्हणूनच 'आदिपंढरी' म्हणून ओळखले जाते.


वालावलला कसे जाल?

वेंगुर्ला-बागायत चौके रोड-लोखंडेवाडी-नारायण टेम्पल रोड-वालावल

वालावलमध्ये राहण्यासाठी सुंदर ठिकाणे?

वालावलला राहण्यासाठी अनेक सुंदर रुम्स उपलब्ध आहेत. हॉटेल, आणि स्वतंत्र बंगल्यांचीदेखील सोय आहे. अनेक निवासस्थाने गर्द झाडांच्या छायेत गारवा देणारी आहेत. अधिक तापमानात जरी याठिकाणी गेला तरी गारवा अनुभवता येईल, असे हे ठिकाण आहे. 

काय काय खाल?

कोकणात आलाय तर मच्छीवर ताव मारायलाचं हवा. सुरमई मच्छी, कोळंबी, बांगडा, मच्छीकरी, चिकन, अंडाकरी, सुकी बोंबील, गोलमा, कोकम, घावणे-चटणी, शहाळ्याचा रस, तांदळाचे पापड, तांदळाचे उकडी मोदक, उकडी पातोळ्या.


वालावलमध्ये आणखी काय पाहाल?

आरावकर गणेश मंदिर, श्री देव कालेश्वर मंदिर, काळसे बेट, कुपीचा डोंगर, श्रीदेव रवळनाथ पंचायतन मंदिर.


Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …
Discover Konkan : कोणार्कचं नव्हे तर कोकणातही आहे अप्रतिम सूर्यमंदिर!
Konkan Coastal Tourism : कऱ्हाटेश्वर, नांदिवडे अन्‌ जयगडला जा फिरायला
Discover Konkan : वेंगुर्लाला गेलात! 'ही' ठिकाणे एकदा तरी नक्की फिरा
Unexplored Konkan : वालावल, नेरुर अन् निवती खुणावतोय!
Unexplored Konkan : कोकणात दडलीय ही सुंदर ठिकाणे, तुम्ही पाहिली का?
Konkan Travel : रत्नागिरीतील 'मालगुंड'ला कधी गेलाय का? ही सुंदर ठिकाणे पाहा…
Discover Of Sindhudurg : कोकणात मँग्रुव्हची सफर! देवबागचा संगम पाहाच
Konkan-Vengurla Tourism : गर्द झाडीतल्या आरवली, मोचेमाडला नक्की जा!
Konkan Devbag Explore : 'देवबागच्या मिनी केरळ'ला गेलात का?
Konkan kandalvan Safari : कांदळवनांचं पर्यटन करणाऱ्या गावात नक्की जा!
https://pudhari.news/maharashtra-tourism-konkan-sindhudurg-walaval-explore-lakshmi-narayan-ravalnath-temple-karli-river
https://pudhari.news/soneri/ankita-walawalkar-wedding-place-village-attraction-walawal-temple


Wednesday, February 19, 2025

छ. संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन संगमेश्वरातील कसबा गाव पाहिले का?



संगमेश्वरातील कसबा हे छत्रपती संभाजी महाराजाच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेले गाव आहे. याच परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे. कसब्यामध्ये प्रवेश करताच हे स्मारक लक्ष वेधणारं आहे. गाव तसं खूप जुनं. अनेक वाडे आणि अस्सल कोकणी पद्धतीची घरे असणारे हे गाव तुम्हाला इतरत्र कुठेही दिसणार नाही. नक्षीदार जाळ्यांनी सजलेले वाड्यांच्या दारे-खिडक्या, जुन्या लाकडांच्या खांबांनी सजलेल्या भिंती, चबुतरे, चिरेबंदी घरे मजली - दुमजली करत सलग पाहता येतात. जाडजूड भिंती अन्‌ चिंचोळ्या रस्त्याने कसबा गावात जाता येतं. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कट करून पकडण्यात आलं ते हेच गाव असं म्हटलं जातं. पण, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आजही इथे इतिहासाची साक्ष देणारी आहे. महाराजांचा त्याग, शक्ती, आणि अलौकिक शौर्याचा वारसदार म्हणून साक्ष देत जागणारं गाव म्हणजे कसबा पेठ संगमेश्वर होय. जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर आणि परिसरातील विविध ठिकाणांबद्दल. रत्नागिरी जिल्ह्यात कसबा पेठ संगमेश्वर अशी ओळख असलेले गाव. याच गावात छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून ठेवलेल्या वाड्यांचे अवशेष आजही त्यांच्या बलिदानाची साक्ष देतात. याच गावात संगमेश्वर अन्‌ चालुक्यकालीन श्री कर्णेश्वर ही प्राचीन मंदिरे कोकण भूमीला इतिहासाची सुंदर किनार प्रदान करतात. याच गावात 'अलकनंदा' आणि 'वरुणा' या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले 'कसबा संगमेश्वर' कोकणाला सुंदर वलय प्राप्त करून देतात. याच संगमेश्वरला देवळांचे गाव म्हटलं जातं मग ते कर्णेश्वर असो वा सप्तेश्वर. या ठिकाणांना तुम्ही आवर्जुन भेट द्या. संगमेश्वर हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्‍नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर हे मुंबई – गोवा महामार्गावर वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेने देखील संगमेश्वरला जाता येते. छत्रपती संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे. संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास 'रामक्षेत्र' असेही म्हटले जाते. संगमेश्वरला जाण्यासाठी राजापूरची गंगा ठिकाणापासून अडीच तासांचा रस्ता आहे. सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिध्द महादेव मंदिर आहे. कर्णेश्वर मंदिर – हे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे भूमीज नागर शैलीतील मंदिर आहे. कर्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर गावात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेपासून थोडे पुढे गेल्यावर हे आहे. इसवी सन २०१२ मध्ये या मंदिराला पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. कर्णेश्वराचे मंदिर हे काही जण कर्ण राजा (कोल्हापूर) ने बांधले असावे असे म्हणतात. तर काही जण इ.स. १०७५ ते १०९५ या काळात गुजरातच्या चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असावे, असे अभ्यासक म्हणतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. मंदिरात गेल्यानंतर भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड आहे. सोबत पार्वतीची मूर्तीही आहे. सप्तेश्वर मंदिर प्राचीन जल व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण म्हणजे सप्तेश्वर मंदिर होय. जंगलातून जाणाऱ्या या मार्गावर दुचाकी घेऊन जाणे अधिक सोईस्कर ठरेल. कसबा गावातून ४ किमी. अंतरावर शंकराचे मंदिर आहे. याठिकाणी गेल्यानंतर पाण्याचे मोठे कुंड आणि सभोवताली सात कमानी पाहायला मिळतात. बारा महिने या कुंडात स्वच्छ पाणी पाहायला मिळतात. या कुंडात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह या सात कमानींमधून येतो म्हणूनच या मंदिराला सप्तेश्वर असे नाव पडले असावे. सरदेसाई वाडा - संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचे वास्तव नेहमी होते. विशाळगडाहून रायगडला जाताना १ फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरला या वाड्यात मुक्कामाला आल्याची नोंद आहे. या वाड्यात महाराजांविषयी दुर्देवी घटना घडली. शेखनिजामाने हा वाडा जाळला अन्‌ गावातील मंदिरे तोडल्याचं म्हटलं जातं. आजही या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. कसे जाल? संगमेश्वर बस स्थानकापासून संगमेश्वर रेल्वेस्टेशन ४ कि. मी. अंतरावर आहे. संगमेश्वर बस स्थानकापासून देवरुख १७ कि. मी. अंतरावर आहे. साखरपाला जाण्यासाठी दर ३० मिनिटांनी देवरुख येथून बस आहेत. संगमेश्वराहून रत्‍नागिरी, लांजा आणि राजापूरकडे जाणाऱ्या बसेस आहेत.







मातीचे आरोग्य: अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा पाया

माती ही केवळ शेतीची जमीन नसून ती संपूर्ण सजीवसृष्टीचा आधार आहे. मानवाचे अस्तित्व, अन्नाची निर्मिती, जलसाठ्यांचे संवर्धन, हवामान संतुलन आणि ज...