Monday, May 20, 2024
Friday, May 3, 2024
Mystery Of Devache Gothane : 'रहस्यमयी' देवाचे गोठणे अन् बारसूमध्ये असे आहे तरी काय? ज्याची चर्चा होतेय! (Video)
बारसूमधील कातळशिल्पांना राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा, अशी मागणी होत आहेच. किंबहुना, कोकणातील अनेक कातळशिल्पांना जागतिक वारसा स्थान मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुळात बारसू (ता. राजापूर) हे कातळशिल्प राज्य सरकारने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहेच. सोबतच सिंधुदुर्गातील कुडोपी, रत्नागिरीतील उक्षी, जांभरुण, कशेळी, बारसू, देवाचे गोठणे, निवळी, चवे देऊड, रुंधेतळी, देवी हासोळ अशी कातळशिल्पे आजदेखील अस्तित्वात आहे. ही दगडात कोरलेली शिल्पे मानवी उत्क्रांतीची साक्ष देतात. मासे, जलचर सृष्टी, प्राणी, माणसे आणि अनेक रहस्य़मयी कातळशिल्पे जी कल्पना करण्याच्या पलिकडे आहेत. काही कातळशिल्पे जांभ्या दगडांमध्ये कोरली गेलेली आहेत. कोकणातील ही कातळशिल्पे जवळपास ४५ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे म्हटले जाते. वरील कातळशिल्पांपैकी आज देवाचे गोठणे आणि बारसू येथील कातळशिल्पांबद्दल जाणून घेणार आहोत. देवाचे गोठणे येथील कातळशिल्पांना जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. येथे एक आश्चर्यजनक घटना घडते, ज्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्षात घेऊ शकता.
[caption id="attachment_784134" align="alignnone" width="573"]
बारसूतील कातळशिल्प[/caption]कोकणातील कातळशिल्पे प्रागैतिहासिक आणि मध्याश्मयुगीन मानवाने कोरलेल्या शिल्पाकृती असल्यामुळे या ठिकाणांना खूप महत्त्व आहे. बारसू आणि देवाचे गोठणे ही दोन्ही कातळशिल्पे मध्याश्मयुगीन काळातील आहेत. देवाचे गोठणे आणि बारसू ही दोन्ही ठिकाणे कुतुहल निर्माण करणारी आहेत. पैकी देवाचे गोठणे या ठिकाणी तुम्ही एकदा का होईना भेट द्यायलाचं हवी. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात १) बारसू आणि २) देवाचे गोठणे ही दोन गावे आहेत. या दोन्ही ठिकाणी कातळशिल्प आहेत. 'रहस्यमयी' देवाचे गोठणे कातळशिल्प विलक्षण अनुभव देणारे ठरेल.
[caption id="attachment_784146" align="alignnone" width="470"]
बारसूतील कातळशिल्प[/caption]बारसूची कातळशिल्पे कुतूहल निर्माण करणारी
बारसू हे गाव तसे छोटे पण नारळ, पोफळी, आंब्याच्या झाडांनी वेढलेले. काजूची अनेक मळे, हिरवागार निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट आणि नीरव शांतता अनुभवायला येते. कोल्हापूरपासून साडे तीन तासांचा प्रवास करत बारसूला पोहोचता येतं. जाताना बारसू नावाचे फलक दिसते. पण, त्या गावात न जाता, अलिकडेच डाव्या बाजूला कच्चा रस्ता गेला आहे. दोन किलोमीटर आतमध्ये हा रस्ता असून याठिकाणी चारचाकी आणि दुचाकीने कातळशिल्पांपर्यंत जाता येते. पण आजूबाजूला बऱ्याच किलोमीटर अंतरावर कोणत्याही सुविधा नसल्याने सोबतचं पाणी आणि खाऊ घेऊन जाणे सोयीचे ठरते.
बारसूतील कातळशिल्प[/caption]बारसूच्या एका विस्तीर्ण पठारावर तीन ते चार ठिकाणी विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. जांभ्या दगडांवर प्राण्यांची चित्रे, वाघ, ससा, छोटे-मोठे मासे, मानवी आकृती, समुद्र असे अनेक शिल्पे आहेत. अशी काही शिल्पे आहेत, जी समजण्यापलिकडे आहेत. ही शिल्पे आकाराने मोठी आहेत. तर काही आकृत्या आकाराने छोट्या आहेत. त्यातील काही शिल्पांचा अर्थ किंवा त्या आकृत्या नेमक्या कशाचा आहेत? हे पटकन लक्षात येत नाहीत. कातळशिल्पांचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक, तज्ज्ञ, इतिहासकार यावर संशोधन करताना दिसतात.
[caption id="attachment_784143" align="alignnone" width="573"]
बारसूतील कातळशिल्प[/caption]बारसूला कसे जाल?
कोल्हापूरपासून बारसूला जाण्यासाठी साडेतीन तासांचा कालावधी लागतो.
[caption id="attachment_784142" align="alignnone" width="573"]
बारसूतील कातळशिल्प[/caption]कोल्हापूर-गगनबावडा-अणुस्कुरा घाट-पाचाल रोड-रायपाटण-मुंबई गोवा हायवे-हार्डी ब्रीज-बारसू कातळशिल्प (petroglyphs of barsu)
बारसूतील कातळशिल्प[/caption]'गूढ' देवाचे गोठणे कातळशिल्पाचे
अविस्मरणीय ठिकाण म्हणजे देवाचे गोठणे. हे एक छोटं खेडेगाव. मातीची कोकणी कौलारू घरं, मातीने, शेणाने सारवलेले विस्तीर्ण अंगण, समोर तुळस, हंबरडणारी गुरे, आंबा, काजू, फणस, सुपारी, कोकम, पळस, फुले, माडाची झाडे आणि त्यातून येणार चिवचिवाट असा निसर्ग इथे अनुभवायला येतो. या गावातून पठारावर जाणारी एक छोटी वाट आहे.

तुम्ही जाणार असाल तर गावातील एखाद्या व्यक्तीला किंवा मुलांना सोबत घेऊन या पठारावर जाऊ शकता. शक्यतो या लॅटेराईट पठारावर एकटे जाऊ नये. कारण भल्या मोठ्या पठारावर येथील कातळशिल्प शोधणे कठीण जाते.
देवाचे गोठणे[/caption]गावातून पायवाट तुडवत अर्धा तासांच्या चढतीनंतर पठारावर पोहोचता येते. अंदाजे साडे सात ते ८ फूट माणसाची प्रतिमा येथे कोरलेली आहे. हे गूढ कातळशिल्पे पाहण्यासाठी हजारो पर्यटक, अभ्यासक याठिकाणी येतात. या मानवाच्या प्रतिमेवर विविध ठिकाणी होकायंत्र ठेवल्यानंतर उत्तर - दक्षिण अशी अशी दिशा स्थिर होत नाही. शिवाय होकायंत्र गोल गोल फिरत राहते. त्याचा व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिलेला आहे.
file photo[/caption]या खडक चुंबकीय विसंगती दर्शवतो. या मानवाच्या पूर्ण प्रतिमेवरचं हे होकायंत्र काम करत नाही. मुळात चुंबकसूची (सुई) पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर-दक्षिण दिशेने स्थिर होते. पण या प्रतिमेवर होकायंत्राची सुई कधी सुलट तर कधी उलट आपोआप गोल फिरत राहते.
भार्गव राम मंदिर[/caption]या गूढ ठिकाणाचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक, इतिहास तज्ज्ञ या ठिकाणी येत असतात. या मानवाची प्रतिमा असलेल्या कातळशिल्पावरचं होकायंत्र उत्तर-दक्षिण स्थिर होत नाही. पण, या आकृतीपासून होकायंत्र बाजूला नेताच पुन्हा होकायंत्राची सूई दिशा दर्शवते.
[caption id="attachment_784150" align="alignnone" width="652"]
सोलगावातून देवाचे गोठणेला जाता येते[/caption]या मानवाच्या पायाजवळ तर होकायंत्राची सुई अजिबात दिशा दाखवत नाही.
देवाचे गोठणेकडे जाणारा पूल[/caption]'देवाचे गोठणे'ला कसे जाल?
देवाचे गोठणे हे बारसूपासून नजीक आहे. बारसूपासून अर्धा तासाचे अंतर कापल्यानंतर देवाचे गोठणे या ठिकाणी जाता येते. सोळगाव देवाचे गोठणेला जाताना डाव्या बाजूना फलक दिसतील. शिवाय सोळगाव देवाचे गोठणेच कमानदेखील दिसेल. तिथून आतमध्ये जाता येईल. शिवाय काही अंतर पार केल्यानंतर पुन्हा डाव्या बाजूला एक ब्रीज असून भार्गव राम मंदिर दिसेल, त्या ठिकाणी गाडी पार्क करता येईल.
[caption id="attachment_784148" align="alignnone" width="1600"]
भार्गव राम मंदिर[/caption]भार्गव राम मंदिर -
कोकणातील भार्गव राम मंदिर पाहण्यासारखे असून मोठे आहेत. सभोवताली छोटी-छोटी मंदिरे आहेत. या कौलारू मंदिरात खूप शांतता आणि थंड वातावरण आहे.

देवाचे गोठणेला जाताना फाट्यावर एका हॉटेल आहे, जिथे तुम्हाला उत्तम प्रकारचे जेवण, चहा, कॉफी, थंड पेये, नाश्ता मिळू शकतो.
[caption id="attachment_784137" align="alignnone" width="716"]
भार्गव राम मंदिर परिसरातील अन्य मंदिरे[/caption]आणखी काय पाहाल?
देवीहसोळ कातळशिल्पे, कशेळी, देवघळी बीच, कनकादित्य मंदिर, पूर्णगड (किल्ला), पावस देवस्थान.
[caption id="attachment_784131" align="alignnone" width="1600"]
नंदी[/caption]विशेष म्हणजे अनेक परदेशी पर्यटक, अभ्यासक य़ाठिकाणाला भेट देतात. ती कातळशिल्पे कॅमेराबद्ध करतात. आपल्याला जर या ठिकाणांविषयी कुतुहल असेल तर एकदा या दोन्ही ठिकाणांना अवश्य भेट दिलीच पाहिजे!
[caption id="attachment_784141" align="alignnone" width="1600"]
देऊळवाडीतील भार्गवराम मंदिर[/caption]Video- Amucha Maharashtra insta वरून साभार
हेदेखील वाचले का?
- Konkan Walaval Explore : फक्त समुद्र काय पाहता? ‘वालावल’ पण पाहा ना!
- Konkan-Vengurla Tourism : गर्द झाडीतल्या आरवली, मोचेमाडला नक्की जा!
- Konkan Devbag Explore : ‘देवबागच्या मिनी केरळ’ला गेलात का?
- Konkan kandalvan Safari : कांदळवनांचं पर्यटन करणाऱ्या गावात नक्की जा!
- Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन् बामणघळ …
- Discover Konkan : कोणार्कचं नव्हे तर कोकणातही आहे अप्रतिम सूर्यमंदिर!
- Konkan Coastal Tourism : कऱ्हाटेश्वर, नांदिवडे अन् जयगडला जा फिरायला
- Discover Konkan : वेंगुर्लाला गेलात! ‘ही’ ठिकाणे एकदा तरी नक्की फिरा
- Unexplored Konkan : कोकणात दडलीय ही सुंदर ठिकाणे, तुम्ही पाहिली का?
- Unexplored Konkan : वालावल, नेरुर अन् निवती खुणावतोय!
- Konkan Travel : रत्नागिरीतील ‘मालगुंड’ला कधी गेलाय का? ही सुंदर ठिकाणे पाहा…
- Unseen Konkan: मालवणमधील ‘ही’ प्रसिध्द ठिकाणे पाहिली का?
- Mahabaleshwar Explore : महाबळेश्वरला जाताना ‘ही’ ठिकाणेही नक्की पाहा!
- Satara Wai Places Explore :स्वदेस, गंगाजल चित्रपटांनाही ‘मेणवली’ची भूरळ
- Karneshwar Temple :संभाजी महाराजांचे वास्तव्य असलेले ‘संगमेश्वर-कर्णेश्वर’
- Ratnagiri best Tourism : राजापुरात पाहायला जा ‘ही’ अद्भूत ठिकाणे
Tuesday, April 30, 2024
blog link
https://pudhari.news/blog/782278/maharashtra-day-special-explore-sahyadri-pawankhind-vishalgad-paleshwar-waterfall-and-manoli-dam-tourism/ar
https://pudhari.news/maharashtra/354607/best-places-in-ratnagiri-tourism-know-about-rajapur-tourism/ar
https://pudhari.news/blog/342780/know-anout-konkan-tourism-dhamapur-bhagvati-devi-temple-and-ratris-khel-chale-wada/ar
https://pudhari.news/features/778413/goa-panjim-beautiful-shri-maruti-temple-shri-hanuman-madir/ar
https://pudhari.news/features/767486/maharshtra-tourism-satara-mahabaleshwar-pustakanch-gaav-bhilar-lingamala-waterfall-explore/ar
https://pudhari.news/blog/342780/know-anout-konkan-tourism-dhamapur-bhagvati-devi-temple-and-ratris-khel-chale-wada/ar
https://pudhari.news/features/754908/satara-wai-places-explore-best-places-for-movies-shooting-and-photography/ar
https://pudhari.news/maharashtra/376761/gaonkhadi-ganeshgule-malgund-know-about-famous-destinations-in-ratnagiri/ar
https://pudhari.news/blog/439099/discover-konkan-best-beaches-and-tourist-places-in-vengurla/ar
https://pudhari.news/maharashtra/426674/unexplored-maharashtra-konkan-travel-hidden-beautiful-places/ar
https://pudhari.news/maharashtra/390582/unexplored-konkan-tambaldeg-dahibav-mithbav-and-others-hidden-places/ar
https://pudhari.news/blog/473862/discover-konkan-ratnagiri-konkan-kasheli-kankaditya-temple-purngad-pawas-ganeshgule/ar
https://pudhari.news/maharashtra/461175/konkan-coastal-tourism-ratnagiri-travel-ganeshgule-nandivade-beach-and-others/ar
https://pudhari.news/blog/487308/maharashtra-konkan-tour-velneshwar-bamanghal-and-hedavi-tavsal-pheri-boat/ar
https://pudhari.news/blog/492505/konkan-shrivardhan-kalinje-kandalvan-safari-harihareshwar-velas-tourism/ar
https://pudhari.news/features/688478/konkan-vengurla-tourism/ar
https://pudhari.news/features/684127/tarkarli-devbag-konkan-maharashtra-tourism-best-places/ar
https://pudhari.news/features/youthworld/758888/maharashtra-tourism-konkan-sindhudurg-walaval-explore-lakshmi-narayan-ravalnath-temple-karli-river/ar
https://pudhari.news/features/youthworld/170781/famous-beach-in-ratnagiri-district-known-as-ambolgad/ar
https://pudhari.news/maharashtra/337008/travel-tour-how-to-reached-devghali-beach-at-kasheli-in-rajapur-ratnagiri/ar
https://pudhari.news/maharashtra/331651/travel-destination-these-5-places-are-best-for-couples/ar
https://wortheum.news/yavatmal/@krushnarendracha/1-day-ago
https://pudhari.news/features/439099/discover-konkan-best-beaches-and-tourist-places-in-vengurla/ar
https://pudhari.news/latest/688478/konkan-vengurla-tourism/ar
https://pudhari.news/maharashtra/461175/konkan-coastal-tourism-ratnagiri-travel-ganeshgule-nandivade-beach-and-others/ar
https://pudhari.news/features/tour-and-travels/758888/maharashtra-tourism-konkan-sindhudurg-walaval-explore-lakshmi-narayan-ravalnath-temple-karli-river/ar
https://pudhari.news/latest/479855/discover-of-sindhudurg-devbag-malvan-and-sindhudurg-tourism/ar
https://pudhari.news/blog/342780/know-anout-konkan-tourism-dhamapur-bhagvati-devi-temple-and-ratris-khel-chale-wada/ar
https://pudhari.news/maharashtra/354607/best-places-in-ratnagiri-tourism-know-about-rajapur-tourism/ar
https://pudhari.news/maharashtra/622526/shravan-2023-maharashtra-sangmeshwar-karneshwar-temple/ar
https://pudhari.news/features/754908/satara-wai-places-explore-best-places-for-movies-shooting-and-photography/ar
https://pudhari.news/features/767486/maharshtra-tourism-satara-mahabaleshwar-pustakanch-gaav-bhilar-lingamala-waterfall-explore/ar
https://pudhari.news/blog/342780/know-anout-konkan-tourism-dhamapur-bhagvati-devi-temple-and-ratris-khel-chale-wada/ar
https://pudhari.news/maharashtra/376761/gaonkhadi-ganeshgule-malgund-know-about-famous-destinations-in-ratnagiri/ar
https://pudhari.news/blog/784073/mystery-of-devache-gothane-barsu-katalshilp-petroglyphs-rajapur-ratnagiri-konkan-maharashtra-tourism/ar
https://pudhari.news/blog/630627/these-five-famous-mysterious-shiva-temples/ar
Maharashtra Day Special Explore Sahyadri : पावनखिंड-विशाळगडच नव्हे तर 'पालेश्वर'चा धबधबा, 'मानोली'ही आहे खास
पश्चिम घाटाचे सौंदर्य काय आणि किती वर्णावे. पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले विशाळगड हे निसर्ग संपन्न असलेले पर्यटन स्थळ होय. अणुस्कुरा खिंड आणि आंबा घाट हे कोल्हापूरच्या बाजारपेठेला कोकण बंदरांशी जोडणारे ठिकाण. (Maharashtra Day Special Explore Sahyadri) अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार 'विशाळगड' आहे. नावाप्रमाणेच विशाल असणारा हा गड सर करण्यासाठी अनेक ट्रेकर्स, पर्यटक आणि भाविक इथे येतात. राम मंदिर, मलिक रेहान दर्गा याठिकाणे असंख्य हिंदू-मुस्लिम भाविक हजेरी लावतात.
खासकरून कर्नाटकातून इथे येणारी भाविकांची संख्या खूप आहे. आम्ही तुम्हाला या लेखामध्ये पावनखिंड, विशाळगड, पालेश्वर धबधबा, मानोली धरण, कोकण दर्शन अशा असंख्य पर्यटनस्थळांची माहिती देणार आहोत. कोल्हापुरातून विशाळगडला जाणार असाल एका दिवसात ही स्थळे तुम्हाला पाहता येतील. पण थोडी विश्रांती हवी असल्यास यासाठी दोन दिवसांचा वेळ लागेल. दुचाकी-चारचाकीने ही ट्रीप अविस्मरणीय ठरेल. (Maharashtra Day Special Explore Sahyadri)
पैजारवाडी -
कोल्हापुरातून विशाळगडला जात असाल तर वाटेत पैजारवाडी हे गाव लागते. कासवाच्या आकारातील चिले महाराजांचे खूप मोठे मंदिर येथील आकर्षण आहे.
हे मंदिर पाहण्यासारखे आहे. या मार्गाने पुढे जाताना अनेक भाविक-पर्यटक याठिकाणी आवर्जुन भेट देतातचं.
विशाळगड -
गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दमछाक होऊ नये म्हणून गडावर चढताना स्थानिक लोकांची थंडगार पेय असलेली छोटी दुकाने आहेत. वृद्ध लोकांसाठी पालखीप्रमाणे डोली उपलब्ध आहे. विशाळगडावर पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे स्वत: पाण्याची सोय करणे, हे कधीही उत्तम.
विशाळगाडवर राहण्यासाठी छोट्या-छोट्या खोल्या भाड्याने मिळतात. पण पाण्याअभावी गडावर अनेक पर्यटक राहत नाहीत. त्याऐवजी जाताना अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत, त्याठिकाणी राहणे पसंत करतात.
विशाळगडला दोन मार्गाने जाता येते -
१) पावनखिंड मार्गे - बांबवडे-मलकापूर-पांढरपाणी-भात तळी-गजापूर-पावनखिंड लागते. येथून काही किलोमीटर अंतरावर विशाळगडला जाता येते.
२) आंबा वाघझरा मार्गे - बांबवडे- शाहूवाडी-मलकापूर-आंबा-विशाळगडला जाता येते. मलकापुरातून विशाळगडला थेट रस्ता आहे.
विशाळगडमध्ये काय काय पाहाल?
खोकलाईदेवीचे मंदिर, विशाळगड किल्ला, राम मंदिर, अमृतेश्वर महादेव मंदिर, हजरत मलिक रेहान दर्गा (२ दर्गा आहेत), मुंडा दरवाजा, कोकण दरवाजा, अहिल्याबाई समाधी मंदिर, वाघजाई मंदिरे, वीर बाजीप्रभू देशपांडे समाधी, शिवकालीन लहान पूल, मारुती मंदिर, पाण्याच्या टाक्या, गडावर चार दरवाजा, नरसोबा मंदिर, तलाव, टकमक कडा, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधी, दोन विहिरी (चौकोनी आणि अर्धचंद्राकार विहिर), पंत अमात्य यांच्या जुन्या राजवाड्याचे अवशेष.
काय खाल?
गडावर मात्र स्वत: जेवण बनवावे लागेल. प्यायचे पाणीदेखील याठिकाणी पैसे देऊन विकत घ्यावे लागते. उन्हाळ्यात रानमेवा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.
पालेश्वर धरण आणि धबधबा -
मलकापुरातून ३ कि.मी. आतमध्ये हे धरण आणि धबधबा आहे. येथे पावसाळ्यात असंख्य पर्यटक पालेश्वर धबधब्याचा आनंद लुटतात.
कोल्हापूर-बांबवडे-मलकापूर बाजारपेठ. बाजारपेठेतून डावीकडे एक रस्ता गेला आहे जो पांढरेपाणी - पावनखिंड मार्गे विशाळगडला जातो. पांढरेपाणीच्या अलिकडे उजव्या बाजूला एक छोटा कच्चा रस्ता गेला आहे, जो पालेश्वर धरण आणि धब्याधब्याकडे जातो.
पावनखिंड आणि धबधबा -
पालेश्वरमधून बाहेर पडल्यानंतर पावनखिंडीकडे जाता येते. पांढरपाणी अशी त्याची मुख्यत: ओळख आहे. पावनखिंडीचे मुख्य प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे वर्तुळाकार दिसते. भगवा ध्वज इथे फडकताना दिसतो. इथे पार्किंगची सोय आहे.
पुढे गेल्यानंतर मोठा बुरुज दिसतो. या बुरुजावर सहजपणे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पुढे गेल्यानंतर इतिहासाची माहिती देणारे फलक इथे दिसतात.
पावनखिंडीत उतरण्यासाठी लोखंडी जिना[/caption]
बाजीप्रभूंना वीरमरण प्राप्त झाले, त्यामुळे ही जागा पवित्र झाली. अशा या पावनखिंडीत ढाल-तलवारी प्रतिक असलेले बाजीप्रभूंचे स्मृतीस्थान आहे.

लागूनचं मोठा धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होतो. तरुणांची इथे प्रचंड गर्दी असते.

हा धबधबा नयनरम्य असून धबधब्याच्या वरून प्रवाहित होणाऱ्या पाण्यात बसून आनंद लुटता येतो. इतरवेळी धबधबा आटला की, या खिंडीत उतरण्याची सोय आहे.
कोंबडी वडे[/caption]
अनेक ट्रेकर्स खिंडीतून ट्रेक करण्यासाठी याठिकाणी येत असतात.
बांगडा-मच्छि करी-चिंचेचा कोळ[/caption]
काय खाता येईल?
उन्हाळ्यात य़ाठिकाणी स्थानिक लोक मसाले ताक, कोकम , सरबत, कोकम फळे, करवंद, जांभूळ, चिकन्या, कलिंगड, चहाची विक्री करतात. तर पावसाळ्यात गरमागरम मक्याचे कणीस, मॅगी, मसाले चहा, भजी विकतात. किंवा तुम्ही घरचे जेवण आणून याठिकाणी बसून जेवलात तरी चालते. येथे ऐसपैस जागा आहे.
पावनखिंडीतील धबधबा[/caption]
कोकण दर्शन -
'कोकण दर्शन' या नावाने सह्याद्री सनसेट पॉईंट आहे. असंख्य पर्यटक याठिकाणी सुर्यास्त पाहण्यासाठी गाड्या थांबवून उपस्थिती लावतात. कोकणचे दर्शन याठिकाणाहून होते. सह्याद्रीच्या एका मागोमाग अनेक विशाल रांगा जवळून पाहता येतात.

दुसरा मार्ग आहे - आंबा घाटातून. आंबा गावातून पुढे गेल्यानंतर वाघझरा हे ठिकाण विश्रांतीसाठी उत्तम ठिकाण आहे. (कोकणात जाणाऱ्यांसाठी आंबा घाटाची सुरुवात याठिकाणापासून होते) वाघझरा येथे पर्यटकांना विश्रांतीसाठी सोय केली आहे. वाघझऱ्यातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत, जिथे जंगलाची सुरुवात होते. इथे एक गोड्या पाण्याची विहिर बांधण्यात आली आहे. पूर्वी याठिकाणी खुले तळे होते.
विशाळगडावरील तोफेचे अवशेष
मानोली धरण -
आंब्यातून पुढे आल्यानंतर मानोलीचे धरण दृष्टीस पडते. या धरणापर्यंत गाडीने जाता येते. पावसाळ्यात हे धरण भरल्यानंतर खळखळ वाहणारे पाणी, सभोवतालचा सुंदर परिसर अनुभवता येतो. मानोली धरणाच्या साचलेल्या पाण्यात बोटिंग रायडिंगची सोयदेखील आहे. मानोलीतून पुढे गेल्यानंतर एक रस्ता विशाळगडाकडे गेला आहे.
पंत अमात्य राजवाडा
ट्रीपचा अवधी वाढवला तर बर्कीचा धबधबा देखील पाहता येईल. या धबधब्याला जाण्यासाठी जंगलातून पायवाट असून थोडे चालावे लागते. कोकणात जाणाऱ्यांसाठी पावनखिंडीतून अणुस्कुरा घाटा मार्गे जाता येईल. या मार्गावरून राजापूरला जाण्यासाठी रस्ता आहे.
विशाळगडावरील चौकोनी आकाराची विहिर[/caption]
जाण्यासाठीची योग्य वेळ -
वरील सर्व ठिकाणी १२ ही महिने जाऊ शकता. उन्हाळ्यात मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी कुटुंबासह जाऊ शकता.

पावसाळ्यात याठिकाणी धो-धो पाऊस पडतो. हा पाऊस जर अनुभवायचा असेल तर नक्की जा! पण, पावसाळ्यानंतर याठिकाणी जाणे स्वर्गाहून कमी नाहीये. हिरव्यागार धरतीने ओढलेली धुक्याची चादर, पडणाऱ्या हलक्या सरी, हवेतील गारवा आणि ओलेचिंब झाडांवरून पडणारे टपटप पाणी, भिजलेल्या रस्त्यावरून प्रवास अनुभवणे हे भाग्यात असावे लागते. हिवाळ्यात विशाळगड पाहणे, डोळ्याचे पारणे फेडणारे ठरते.
अमृतेश्वर महादेव मंदिर
ट्रेकिंग -
तुम्ही जर ट्रेकर्स असाल तर तुम्हाला पन्हाळा - पावनखिंड ट्रेकिंग करता येते.
सह्याद्रीच्या रांगा[/caption]
आंबा फाट्यावर अनेक दुकाने आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. येथून तुम्ही कोरडा खाऊ विकत घेऊ शकता अथवा अनेक चांगले हॉटेल्स असल्यामुळे याठिकाणी जेवणदेखील करू शकता.
मातीचे आरोग्य: अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा पाया
माती ही केवळ शेतीची जमीन नसून ती संपूर्ण सजीवसृष्टीचा आधार आहे. मानवाचे अस्तित्व, अन्नाची निर्मिती, जलसाठ्यांचे संवर्धन, हवामान संतुलन आणि ज...
-
संगमेश्वरातील कसबा हे छत्रपती संभाजी महाराजाच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेले गाव आहे. याच परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे. कसब...
-
कोकण फिरायचं म्हटलं तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती गोष्ट म्हणजे, वाहतूक आणि रस्ते. कुठल्याही ठिकाणी जाताना रस्ते जर चांगले असतील तर तासन...
-
मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...













