Sunday, March 19, 2023

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ ...

मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर'ला एकदा का होईना, एकदा तरी भेट द्यायलाच हवी! समुद्राकाठचा वेळणेश्वर निसर्गसृष्टीने वेढलेला आहे. दोन दिवस तर इथे राहून वेळणेश्वर पाहायलाचं हवं. चैतन्यदायी, प्रफुल्लित वातावरण इथं नक्कीच पाहायला मिळते. (Maharashtra Konkan Tour) अथांग सागर, नारळी पोफळीच्या घनदाट बागा, जागृत देवस्थाने आणि अलौकिक निसर्ग सौंदर्य यांचा मिलाप हे वेळणेश्वरचं वैशिष्ट्य सांगता येईल. भगवान परशुरामांचे शिष्य असलेल्या व्याड मुनी यांनी याठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. ''व्याडांचा ईश्वर म्हणजेच वेळणेश्वर.'' याच वेळणेश्वरबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. सोबतच बामणघळ, गुहाघर, तवसाळ अशा अनेक पर्यटन स्थळांविषयी माहिती देणार आहोत. तुम्हाला सुट्ट्या मिळाल्या की, याठिकाणी एकदा तरी नक्की फिरायला जा! (Maharashtra Konkan Tour) वेळणेश्वर गर्दीचं ठिकाण नसलेलं नीरव शांतता असलेलं पर्यटनस्थळ म्हणून वेळणेश्वर गावचा उल्लेख करावाच लागेल. तीव्र उतार, अनेक वळणे घेत वेळणेश्वरच्या गावात जाता येते. वेळणेश्वर हे प्राचीन भूमी असल्याचं म्हटलं जातं. वेळणेश्वरचा निसर्ग फोटोग्राफीची आवड असणार्‍यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. माडाची बने, लाल माती आणि जांभा दगडांची कौलारू घरं लक्ष वेधून घेतात. भात शेती, माडाच्या बनातून गाडीतून लॉन्ग ड्राईव्ह करत वेळणेश्वरला जाता येते. कोकणी पद्धतीची घरे, येथील वातावरण आत्मिक समाधान देऊन जाते. पांढरी वाळू, लांबलचक समुद्रकिनारा, मासे पकडणारे मच्छीमार दृष्टीस पडतात. हिरव्यागार माडाच्या झाडावर चढून शहाळे काढणारे, दोन मिनिटात नारळ सोलणारी कोकणी माणसे पाहून आपल्याला कुतुहल वाटतेच. मोठ्या पावसातही तग धरून राहणारी जांभा दगडांची कौलारु घरे तर निराळीच आहेत! वेळणेश्वरचे मंदिर वेळणेश्वरचे मंदिर अगदी शांत आणि परिसर हवेशीर आहे. वेळणेश्वरचे शिवमंदिर नजरेस पडते. त्यामागे लागूनच निळाशार समुद्रकिनारा पाहावयास मिळतो. निसर्ग परिसरातील या मंदिरात गेल्यानंतर मन प्रसन्न आणि शांत होतं. पोफळीच्या बागा आपसुकच तुमचं लक्ष वेधून घेतो. 'नवसाला पावणारा वेळणेश्वर' अशीही याची ख्याती आहे. मंदिरासमोर १०-१२ फूट उंचीच्या दिपमाळा आहेत. घुमटाकार शिखर हे या मंदिराचे वेगळे वैशिष्ट्य म्हणता येईल. गाभाऱ्यात शिवपिंड असून त्यावर पाच फण्यांचा नाग आहे. या मंदिर परिसरात श्री गणपती, श्री लक्ष्मी नारायण, श्री काळ भैरव अशी मंदिरे आहेत. वेळणेश्वर बीच वेळणेश्वरची खासियत म्हणजे समुद्र किनार्‍यालगत अनेक खडकांची रांग दिसते. आजूबाजूला डोंगर आणि त्यात समुद्राच्या लाटा धडकून उमटलेली शिंपल्यांची नक्षी अतिशय सुंदर दिसतात. समुद्राच्या एका किनार्‍याच्या डोंगरातून एक नदी येऊन ती समुद्राला मिळते. हा अप्रतिम नजारा कुणाला आवडणार नाही. कसे जाल? चिपळूणजवळ वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे. गुहागरपासून २२ किलोमीटर तर चिपळूणपासून एका तासांचा रस्ता आहे. कुठे राहाल? वेळणेश्वरात राहण्यासाठी काही रिसॉर्ट्स आहेत. जाण्यापूर्वी तुम्ही बुकिंग करू शकता. येथे घरगुती निवास व्यवस्था, निवासाचीही सोय आहे. हेदवी - बामणघळ : गुहागर तालुक्यातील हेदवी गावात हेदवी बीच आहे. चिपळूणपासून २५ किमी. अंतरावर हेदवी गाव आहे. समुद्राच्या खडकांमध्ये एक घळ आहे, त्यास बामणघळी म्हटले जाते. परिसरात उमा महेश्वर मंदिर आहे. कातळाला २५ फूट लांबीची चीर पडली असून यामध्ये समद्राच्या लाटा येऊन झडकतात. भरतीवेळी तर हे पाणी ३०-३५ फूट उंचावर उडते. निमुळत्या घळीचा हा अविष्कार तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. (Maharashtra Konkan Tour) कसे जाल? गुहागरपासून २५ किमी. अंतरावर हे गाव आहे. काय खाल? उकडलेले मोदक, सुरमई, शहाळे, मच्छी, भात, वरण, आमटी, तांदळाची भाकरी, घावणे, पापड, सोलकढी, लोणचे, फणस भाजी, आंबे. श्री दशभूज लक्ष्मी गणेश मंदिर - साध्या पद्धतीचे हे मंदिर तुमचं लक्ष वेधून घेणारे आहे. जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिध्द आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात डोंगर माथ्यावर हे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना पेशवे काळात झालीय. तवसाळ फेरी बोट जयगडहून तवसाळला फेरी बोट घेऊन जाता येते. जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे- गुहागर समुद्रकिनारा, सन वेळणेश्वर पॉईंट, राम मंदिर, श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर, उमामहेश्वर देवस्थान हेदवी, नलवी धबधबा उमरठ, तवसाळ बीच इत्यादी. गुहागर, वेळणेश्वर, हेदवीची ही तुमची ट्रीप तुम्हाला नक्कीच आठवणीत राहिल!

Thursday, March 9, 2023

Discover Of Sindhudurg : कोकणात मँग्रुव्हची सफर! देवबागचा संगम पाहाच

तुम्ही मालवण, सिंधुदुर्गला गेला असाल. पण कधी मँग्रुव्ह सफारी कधी केलीय का? मँग्रुव्हची सफारी एक अविस्मरणीय अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदूर्गच्या समुद्रात मोठ्या डौलात उभारलेला किल्ला तर अद्भूतचं. वर्षानुवर्षे हा किल्ला पाण्यात तग धरून आहे. नौका पर्यटन ही येथील खासियत. (Discover Of Sindhudurg) या नौकाच्या माध्यमातून अनेक लोकांना मिळालेला रोजगार हे विशेष आहे. मागील लेखात आम्ही तुम्हाला पूर्णगड, पावस, कशेळीबद्दल माहिती दिलीय. तुम्ही हा लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. आज आम्ही तुम्हाला मँग्रुव्हची सफर, तारकर्ली, सिंधुदुर्ग, चिवला बीच, रॉक गार्डन, रामेश्वर मंदिर अशा असंख्य पर्यटनस्थळाविषयी सांगणार आहोत. कोकणात फिरताना तुम्ही अनेक कदाचित माहिती नसलेल्या स्थळांना नक्कीच भेट देऊ शकता. (Discover Of Sindhudurg) 

  मालवण - मालवणमध्ये तुम्ही तळाशील बीच, तोंडवली बीच, वेंगुर्ला, वायरी, चिवला, आचरा अशा समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकता. तारकर्ली - तारकर्लीमध्ये तुम्हाला पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसेल. खळखळत्या समुद्र पाहिल्यानंतर लाटांवर मनसोक्त डुंबण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. येथील वॉटर स्पोर्ट्स करण्याचा मोह तर तुम्हाला अजिबात आवरणार नाही. विशेष म्हणजे, येथील वॉटर स्पोर्ट्सचे काही खास पॅकेज असतात. यामध्ये पर्यटकांचे आकर्षण म्हणजे पॅराग्लायडिंग होय. भटकंती करणाऱ्यांनी एकदा का होईना, समुद्रात पॅराग्लायडिंग करण्याचा आनंद नक्की घ्यावा. पॅराग्लायडिंग करताना त्या विशालकाय समुद्राचा कसा स्वर्ग दिसतो, हे हवेत गेल्यानंतरच समजते. कुठे राहाल? - तारकर्लीत अनेक हॉटेल्स आणि निवासाची सोय आहे. 

 काय खाल? - येथील king prawn तर लाजवाब. चिकण, मासे, सोलकढी, चपाती, गोलमा, भाकरी, भाजी, बांगडा फ्रायची चव तुम्ही चाखू शकता. 

  सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. किल्ल्यात जाण्यासाठी बोटी उपलब्ध आहे. समुद्र किनाऱ्यावर किरकोळ एन्ट्री तिकीट काढून तुम्हाला बोटीत बसता येते. सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन बोटीतून किल्ल्यावर जाता येते. किल्ला कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. काय पाहाल?- किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. ही गोड्या पाण्याची विहिर आहे. किल्ल्याच्या बाहेर समुद्राचे खारे पाणी आणि आत बेटावर गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे. यामुळे किल्ल्याच्या आतमध्ये काही रहिवासी अद्यापही राहतात. किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत. याचे बाहेरून दर्शन घेता येते. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. किल्ला परिसर फिरताना तुम्ही टोपी, पाण्याची बाटली आणि खाऊदेखील सोबत ठेवू शकता. 

 किल्ल्यामध्ये काय मिळेल? - किल्ल्याच्या आतमध्ये कोकम, लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम फळ, मँगो ज्यूस, आईस्क्रीम, फळे, बोर, फणस इतर खाऊ मिळेल. 

  देवबाग - सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवबाग समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी कमी असते. नदी आणि सागराचा अद्भूत संगम येथे पाहता येतो. काजू, नारळाची झाडे आणि खारफुटीच्या रांगा आहेत. येथे स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, जेट स्कीईंग, मोटरबोट राईंडचा आनंदही घेता येतो. 

आणखी काय पाहाल? - त्सुनामी बेट : देवबागपासून ३ किमी. अंतरावर त्सुनामी बेट आहे. पद्मगड- देवबागपासून १० किमी. अंतरावर पद्मगड महापुरुष मंदिर आहे. महादेवाची पिंड असून किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात. भरतगड- येथे जाण्यास देवबाग पासून १ तास तर मालवणपासून ४७ मिनिटे लागतात. रॉक गार्डन - येथे ३०० ते ४०० वर्षे जुने खडक पाहायला मिळतात. समुद्रकिनारी या खडकांवर बसून भिरभिरणाऱ्या वाऱ्यात रम्य संध्याकाळ अनुभवता येते. येथे बगीचादेखील आहे. रॉक गार्डन देवबागपासून १३ किमी. अंतरावर आहे. रॉक गार्डनजवळ तुम्ही चिवला बीचवर जाऊ शकता. काय खाल? - येथे विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स असल्याने मालवणी डिशेसची चव चाखता येईल. 

 आंगणेवाडी -मालवण शहरापासून १४ किमी आणि कणकवली पासून ३३ किमी. अंतरावर आंगणेवाडी मंदिर आहे. आंगणेवाडीत प्रसिद्ध श्री भराडीदेवी देवीचे मंदिर असून येथे मोठी यात्रा भरते. सर्जेकोट किल्ला - मालवण बीचपासून १७ मिनिटे अंतरावर हा किल्ला आहे. मँग्रूव्ह सफारी - मालवणपासून ५२ मिनिटांवर आचरा येथे तुम्हाला मँग्रुव्ह सफारी करता येते. रामेश्वर मंदिर - दरम्यान, आचऱ्याला जाताना तुम्ही कोळंब येथ रामेश्वर मंदिराला भेट देऊ शकता.

Monday, March 6, 2023

मालवणला गेला तर रात्रीस खेळ चाले वाडा नक्की पाहा, 'ही' ठिकाणेही आहेत प्रसिध्द

कोकण फिरायचं म्हटलं तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती गोष्ट म्हणजे, वाहतूक आणि रस्ते. कुठल्याही ठिकाणी जाताना रस्ते जर चांगले असतील तर तासनतास प्रवास करायला काहीही वाटत नाही. तर मग चला नव्या ठिकाणी भेट द्यायला! कोकणात जायला सर्वांनाच आवडतं. त्यात आरामदायी कोकणची (Unseen Konkan) सफर करायला कुणाला आवडणार नाही? सिंधुदुर्गचा किल्ला, तारकर्ली तर आपण पाहिले आहेच. पण, जरा मालवणमध्ये तुमच्या गाडीची दिशा बदलून तर बघा. मालवणमधील तुम्ही कधी न पाहिलेले सौंदर्य तुम्हाला आँखो देखी मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्रसिध्द ठिकाणांबद्दल सांगणार आहेत, जी ठिकाणे कदाचित तुम्ही पाहिल नसतील किंवा क्वचितच या ठिकाणांची नावे ऐकली असतील. होय, आम्ही तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वेगळ्या पर्यटन स्थळांविषयी सांगणार आहोत, जिथे जाणे सोपे तर आहेच, शिवाय खरा कोकण असतो तरी काय? याची अनुभूती घेण्यासाठी तुम्ही याठिकाणी नक्की जाल!  (Unseen Konkan) तर आम्ही मालवण तालुक्यातील धामापूर, भगवती देवी मंदिर, रात्रीस खेळ चाले वाडा, ठाकर आदिवासी ट्रायबल म्युझियम/ पपेट म्युझियम, ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम ॲण्ड आर्ट गॅलरी या ठिकाणांविषयी सांगणार आहोत. (Unseen Konkan) धामापूर गाव  पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हिवाळ्यात येथील हवामान थंड असते. आपण कधी पाहिली नसेल इतकी हिरवाई या भागात आहे. उंचच्या उंच माडाची झाडे, पोफळीच्या बागा, सुपारीचा माळ आणि त्यांतून पाटांमधून वाहणारे पाणी, सुंदर निसर्गरम्य व शांत वातावरण अशी धामापूरची ओळख आहे. धामापूर तलाव : धामापूर तलावाचे पाणी धामापूर, काळसे, गावांसह संपूर्ण मालवण शहराला पिण्यासाठी नळयोजनेमार्फत पुरविले जाते. अतिशय विस्तीर्ण असा तलावही धामापूरची ठळक वैशिष्ट्ये आहेत. तळ्यामध्ये नौकाविहाराची सुविधादेखील आहे. तलावाला लागूनच भगवती देवीचे मंदिर आहे. हा तलाव १५३० साली राजा नागेशराव देसाई यांनी निर्माण केल्याचे म्हटले जाते. येथे पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. कितीही पाऊस पडला तरी हा तलाव ओसंडून वाहत नाही. तर दुष्काळ पडल तरी तलावातील पाणी आटत नाही, असं म्हटलं जातं. जवळच ७-८ किमीवर चौके मालवण येथे प्रसिद्ध असे भराडी देवीचे मंदिर आहे. कसे जाल? कोल्हापूरपासून जायचे असेल तर : कोल्हापूर- बालिंगे-कळे-असळज-गगनबावडा-वैभववाडी-तळेरे-नांदगाव-कणकवली-कसाल-कट्टा बाजारपेठ-नेरूर-मळकेवाडी-धामापूर गाव. तसेच मुंबईपासून रेल्वे आहे. मुंबई ते कुडाळ असा कोकण रेल्वेचा प्रवास तुम्ही करू शकता. रेल्वे स्टेशनपासून धामापूर हे अंतर १४ किमी. आहे. येथे एसटीबस किंवा रिक्षाने जाता येईल.
भगवती देवी मंदिर : धामापूर तलावाच्या काठावरच भगवती देवीचं मंदिर आहे. भगवती मंदिराची स्थापत्यशैली पारंपरिक कोकणी पध्दतीची आहे. भगवती देवीचे मंदिर कौलारू आहे. ४८०  वर्षाहूनही अधिक जुना इतिहास श्री देवी भगवती मंदिराला आहे. मंदिरावर कोरीव कलाकुसर केले आहे. भगवती देवीची काळ्या पाषाणात कोरलेली सुबक आणि आकर्षक मूर्ती आहे. भगवतीची मूर्ती चतुर्भूज आहे.  शेजारीच खूप मोठे आणि अनेक वर्षे वारुळ आहे. येथे वारुळाचे मंदिर असून त्याची नित्यनियमाने पूजा केली जाते. या मंदिराला सातेरी देवीचे मंदिर असे म्हटले जाते. पर्यटनासाठी म्हणून धामापूर गाव प्रचलित झाले आहे. सिंधुदुर्गचे पर्यटन करणाऱ्या पर्यटकांनी धामापूरला एकदा जाऊन यायलाच हवे! रात्रीस खेळ चाले वाडा : रात्रीस खेळ चाले वाडा पाहण्यासाठी धामापूर तलावापासून ४० मिनिटांचे अंतर आहे. धामापूर गावातून झारप -अक्केरी रोड आहे. हा रोड हायवेला जोडतो. तेथून वाड्याकडे जाणारा मार्ग आहे. हा वाडा जसा मालिकेत दिसतो, तसाच आहे. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, शेणाने सारवलेली जमीन, स्वयंपाक घर, घराच्या मागील बाजूस विहिर आणि सभोवताली झाडी सर्वकाही जसं आहे तसं. हा वाडा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनलं आहे. कसे जाल? धामापूर-मळकेवाडी-कळसे-जकात नाका-मलवण रोड-झारप तिट्टा-झारप अक्केरी रोड-शेटकर वाडा (रात्रीस खेळ चाले वाडा) स्वयंरोजगार आणि व्यवसाय - भगवती मंदिराजवळ काही स्थानिक येथे आवळा सरबत, सिरप, कोकम, कोकोनेट तेल, जास्वंदी तेल, शिकाकाई अशा असंख्य कोकणी पदार्थ, वस्तू विकायला ठेवलेल्या असतात. या कुठल्या कंपनीकडून नव्हे तर ओरिजिनल हातापासून बनवलेले पदार्थ इथे मिळतात. तर काही अंतरावर कंपनीच्या विविध वस्तू जसे की, आंबा बर्फी, कोकोनेट बर्फी, आवला ज्यूस, कोकम, काजू, फणस चीफ्स वगैरे आदी पदार्थ मिळतात. ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम ॲण्ड आर्ट गॅलरी - पिंगुली (pinguli) या गावात हे आंगण आहे. सिंधुदर्ग जिल्ह्यातील ठाकर आदिवासी समाजाच्या परंपरा जपून ठेवण्यासाठी हे संग्रहालय बनवलं आहे. आधीचा आदिवासी समाज कसा राहत होता, त्यांची जीवनशैली कशी होती? याविषयीची माहिती अनेक पुतळे, वस्तू, कपडे आदींच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येथे ठाकर आदिवासी ट्रायबल म्युझियम किंवा पपेट म्युझियमदेखील आहे.

Konkan Coastal Tourism : कऱ्हाटेश्वर, नांदिवडे अन्‌ जयगडला जा फिरायला

मागील काही दिवसांपासून आपण वेंगुर्ला, वालावल, मालगुंड, अंबोली, राजापूर, तांबळडेग, मीठमुंबरी, दहिबाव, मीठबाव, मालवण अशा पर्यटन ठिकाणांची सफर केलीय. महाराष्ट्राला लाभलेली इतकी लांब किनारपट्टी आणि नजरेत भरणारा निळाशार समुद्र...प्रत्येक ठिकाणी वेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. (Konkan Coastal Tourism) रुपेरी वाळूत, माडांच्या बनात, दूरदूरवर समुद्र लाटांवर हेलकावणाऱ्या होड्या, आसमंतात पसरलेले निळे आकाश, पहावी तिकडं माडाची झाडं, पोफळी-सुपारीच्या बागा, खळखळत्या समुद्रात डोकावून पाहणारा चमकणारा सूर्य असा निसर्ग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भटकंती तर करायलाच हवी. आता आम्ही तुमच्यासाठी आणखी काही पर्यटन स्थळे घेऊन आलोय. ही ठिकाणे आहेत गणेशगुळे, पावस, जयगड आणि बरंच काही. तुम्ही गणपतीपुळेला गेला असालचं. पण, गणपतीपुळेपासून अगदी जवळ असणारी ही ठिकाणे पाहिली का? कुठे कुठे फिराल आणि काय खाल, याविषयी इत्यंभूत माहिती आम्ही इथे देत आहोत. (Konkan Coastal Tourism) लेख शेवटयर्यंत वाचा.

ganeshgule beach

गणपतीपुळे -

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ आहे. हा गणपती स्वयंभू आहे. मंदिराच्या समोरचं अथांग पसरलेला समुद्रकिनारा असून इथे वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची गर्दी असते. रो-बोटिंग, मोटरबोट, वॉटर स्कूटर, केळी बोट राईड करण्यासाठी आणि निळाशार समुद्रात मनसोक्त डुंबण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतात. गणपतीपुळेमध्ये खूप सारे हॉटेल्स आणि निवासी घरे आहेत, जिथे तुम्ही राहू शकता.

ganeshgule beach

गणपतीपुळेच्या परिसरातील ही ठिकाणे एकदा नक्की फिरा

प्राचीन कोकण संग्रहालय - प्राचीन काळात कोकण कसा होता? तेव्हाचे राहणीमान, संस्कृती यासारखी असंख्य माहिती या प्राचीन कोकणमधून तुम्हाला अनुभवता येईल. त्याकाळातील लोकांच्या वेशभूषा, बारा बलतेदार, शेतीची अवजारे, त्यांची केशभूषा, लाकडी आणि मातीची भांडी, मंदिरे, यासारख्या गोष्टींची प्रतिकृती आणि मंदिरे पाहता येतील. त्याकाळात अनेक औषधी वनस्पतींचा वापर कसा व्हायचा, याचीदेखील माहिती तुम्हाला पाहता येईल.

काय खाल?

आवळा, जांभूळ, कोकम सरबत, उन्हाळ्यात कैरी पन्हे, मोदक, पुरणपोळी, थालीपीठ, अळुवडी, मासे, काजू, कोकम फळ, मच्छी करी आदी.

मालगुंड- गणपतीपुळेपासून मालगुंड हे कवी केशवसुत यांचे जन्मस्थान आहे. येथे त्यांचे त्याकाळातील घर आणि स्मारकदेखील पाहायला मिशते. याची इत्यंभूत माहिती आपण मागे पाहिली आहे.

 
The Birthplace of Lokmanya Tilak

गणेशगुळे :

गणेशगुळे मंदिर - गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान आहे. रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर गणेशगुळे गाव आहे. ते मुख्य रस्त्यापासून आत असल्याने पटकन लक्षात येत नाही. गणेशगुळेतील गणपतीला स्वयंभू म्हटले जाते. कारण मंदिरात एक मोठी शिळा असून ती दक्षिणाभिमुख आहे. मंदिर जांभ्या दगडात बांधले गेले आहे. मंदिराजवळ समुद्रकिनारा आहे. गणेशगुळे गाव मुसाकाजी बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डोंगर आणि बंदरासमोरील डोंगर याच्या मध्यभागी वसले आहे.

ganeshgule temple

कसे जाल- रत्नागिरीपासून २५ किमी. तर पावसपासून ४ कि.मी. गणेशगुळे आहे. मुंबई ते रत्नागिरी ३६० कि.मी अंतर आहे.
गणेशगुळे समुद्र - स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, जिथे फारसे पर्यटक जात नाहीत. इथे खूप शांतता आणि भिरभिरणारे वारे अनुभवायला मिळते. शांतता आहे म्हणूनचं इथे स्वच्छता टिकून आहे. निसर्गाचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर इथे एक रात्र राहायलाच हवं. गणेशगुळे आणि आजुबाजूच्या परिसरात खूप सारे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि निवासाची सोय आहे. (Konkan Coastal Tourism)

ratndurg[/caption]

प्राचीन दगडांची विहिर - प्राचीन दगडांची विहिर ही पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते. जांभ्या खडकात असलेली ही विहिर ७० फूट खोल आहे.

ratndurg[/caption]

स्वयंभू गजानन मंदिर - रत्नागिरी शहरापासून पावस मार्गावर फक्त १२ कि.मी. अंतरावर, श्री संत गजानन महाराजांचे सुंदर मंदिर आहे. रत्नागिरीजवळ गोळप या ठिकाणी हे गजानन महाराजांचे मंदिर खूप शांत, स्वच्छ आहे.

ratndurg[/caption]

पावस - पावस हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील गाव असून स्वामी स्वरुपानंद मठामुळे पावसचे नाव खूप प्रसिद्ध झाले आहे.

karhateshwar mandir nandiwade  
karhateshwar mandir nandiwade

पूर्णगड किल्ला - पावस देवस्थानापासून पूर्णगडचा किल्ला १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

[caption id="attachment_462004" align="alignnone" width="517"] 
purngad fort

जयगड किल्ला - गणपतीपुळेपासून २० किलोमीटर अंतरावर जयगडचा किल्ला आहे.

जयगड लाईट हाऊस - नांदिवडे येथे तुम्ही जयगडचे लाईट हाऊस पाहू शकता. जवळच नांदिवडे बीच पाहू शकता.

रत्नागिरी फिश मरीन म्युझियम - रत्नागिरीतील फिश मरीन संग्रहालय पाहण्यासारखे असून रत्नागिरी बसस्थानकपासून अडीच किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. जाताना भगवती मंदिर आणि मांडवी बीचदेखील पाहता येईल.

या संग्रहालयात दुर्मिळ आणि सुंदर नमुने आहेत. सी टर्टल्स, ईल्स, सी हॉर्स फिश, लायन फिश, ट्रिगर फिश, सी काकडी, स्टार फिश आदी नमूने पाहता येतात. या संग्रहालयात व्हेलचा मौल्यवान आणि जुना सांगाडा देखील आहे. या व्हेलची मूळ लांबी ५५ फूट लांब आणि वजन ५ जार किलोग्रॅम असल्याचे म्हटले जाते. जवळच मुरुगवाडा आणि व्हाईट सीच बीचलाही भेट देऊ शकता.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान - रत्नागिरी फिश मरीन म्युझियमीासून १०-१२ मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे.
कऱ्हाटेश्वर मंदिर - खूप सारी एनर्जी देणारा हा परिसर आहे. राजापूर तालक्यातील नांदिवडे गावात हे मंदिर असून जयगडच्या किल्ल्यापासून १२ मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे. हे ८०० ते १००० वर्ष जुनं हे मंदिर असल्याचं म्हटलं जातं. तर रत्नागिरीपासून ४८ किमी. अंतरावर हे ठिकाण आहे.

 
The Birthplace of Lokmanya Tilak

आणखी काय पहाल-मुसाकाजी बंदर, आंबोळगड, यशवंतघेरा गड किल्ला, गगगनिरी महाराजांचा आंबोळगडमधील मठ, रानपार जेटी, मत्स्यालय, वॅक्स म्युझियम, मॅजिक मिरर, मालगुंड बीच, प्राचीन कोकण संग्रहालय, जय विनायक मंदिर आणि बाग, आरे-वारेचा बीच, रत्नादुर्ग किल्ला, गणपतीपुळे-रामरोडवर कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्प, जयगड तवसाळ फेरी बोट, सेल्फी पॉईंट रावसा बंदर, थिबा पॅलेस.

Historical Tourism : कडक उन्हाळ्याआधी फिरुन 'या' ही सुंदर ठिकाणे

 कर्नाटकात गेल्यानंतर सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ती म्हणजे तेथीलअप्रतिम मंदिरे. (Historical Tourism) अनेक वास्तूंनी सजलेली शहरे, शिल्पे, मूर्ती अशी ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यायलाचं हवी. नेहमीच्या कामातून थोडा वेळ काढून तुम्ही ही ठिकाणे फिरून येऊ शकता. आम्ही येथे काही ऐतिहासिक ठिकाणांची माहिती देणार आहोत, जी पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही की, अद्यापही काही मंदिरे सुस्थितीत आणि आत्मिक शांतता देणारे आहेत. आपल्या इतिहासातील गोष्टी आपणांस डोळ्य़ांनी पाहता येतात, यापेक्षा दुसरे भाग्यचं नाही! तुम्ही जर अलमट्टीला गेला तर तेथून पुढे बदामी, पट्टडकल, आणि ऐहोळे या तीन ठिकाणांना नक्की भेट द्या. कर्नाटकातील या पर्यटनस्थळांची सफर तुम्हाला नक्की करायला हवी. (Historical Tourism)

अलमट्टी धरण (alamatti dam) -

अलमट्टी -अलमट्टी धरण हे उत्तर कर्नाटकात कृष्णा नदीवर बांधलेले विशाल धरण आहे. विजापूरपासून ६५ किमी अंतरावर विजापूर आहे. तर बंगळूरपासून ४५० किमी. अंतरावर आहे. अलमट्टी धरणाच्या भिंतीची लांबी १५६५ मीटर आणि उंची ५२४ मीटर आहे. अलमट्टी धरण हे लाल बहादूर शास्त्री जलाशय म्हणूनही ओळखे जाते. धरणाची उंची ५२४. २६ फूट इतकी आहे. या धरणाला एकूण २६ दरवाजे आहेत.

[caption id="attachment_468346" align="alignnone" width="770"] Upper Shri Shivalaya Gudi 

कसे जाल?

बागलकोट स्टेशन जवळचे रेल्वे स्टेशन असून अलमट्टी हे ३५ किमी. अंतरावर आहे.

कुठे राहाल?

राहण्यासाठी येथे अनेक कॉटेजेस आणि हॉटेल्स आहेत. अलमट्टी धरण आणि रॉक गार्डन येथे संपूर्ण दिवस फिरता येते. महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवरील हे अलमट्टी धरण विशाल दृष्य नजरेत भरणारा ठरतो. या धरणावरील लाल बहादूर शास्त्री हे कन्नडमध्ये लिहिलेले फलक एक जागतिक विक्रम आहे. जगातील सर्वात लांब धातूच्या बोर्डावरील अक्षरे ही ॲल्युमिनियम आणि लोखंडापासून तयार करण्यात आली आहेत. अगदी चार किलोमीटर दूर अंतरावरून ही नावे व्यवस्थित दिसू शकतात.

अलमट्टी रॉक गार्डन-

विजापूर जिल्ह्यात कृष्णा नदीवर वसलेले हे ठिकाण असून अलमट्टी धरणाच्या अगदी जवळ हे गार्डन आहे. उत्तर कर्नाटकामध्ये हे ठिकाण वसलेलं आहे. किरकोळ रक्कम भरून तुम्हाला एन्ट्री तिकिट मिळते. सुंदर तलाव असून यामध्ये बोटिंग करता येते. पारंपरिक ग्रामीण भागातील संस्कृती कशी होती, याची झलक या गार्डनमध्ये पाहता येते. दुतर्फा गर्द झाडी आणि सुंदर शिल्पे लक्ष वेधून घेतात. अनेक प्राणी, पक्षी आणि माणसांच्या मूर्ती येथे पाहायला मिळतात. कमळांनी फुललेले तलावदेखील तुम्हाला इथे पाहता येईल. वेगवेगळे शिल्प ग्रामीण संस्कृतीची झलक दाखवतात. विशेष, लहान मुलांसाठी टॉय ट्रेनदेखील उपलब्ध आहे. लेक गार्डन, म्युझिकल फाऊंटन गार्डन आहे. या गार्डनमध्ये वेगवेगल्या प्रकारची फुलझाडे पहायला मिळतात. वेगवेगळ्या दगडांवर शिल्पे कोरण्यात आली आहेत. फाऊंटन गार्डनमधील संध्याकळचा लेसर शो दैदिप्यमान ठरतो.

[caption id="attachment_468313" align="alignnone" width="443"] 

aihole

बदामी (badami) -

बदामी हे उत्तर कर्नाटकात असून अप्रतिम वास्तूकला येथे पहायला मिळते. बदामीमध्ये पाहण्यासाठी खूप सारे प्राचीन मंदिर, किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. रॉक-कट गुफा मंदिरांसाठी बदामी प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर पर्यटन करायचे असेल तर बदामीला एकदा तरी नक्की भेट द्या. बदामी हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे.

badami agastya temple

रॉक कट मोनोलिथिक स्ट्रक्चर असलेली बदामी गुफा येथे पाहायला मिळते. एक आणि दुसऱ्या क्रमांकाच्या गुफा कितव्या शतकातील आहेत, याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. मात्र तिसऱ्या गुहेवर शिलालेख आढळतो. ही गुहा ६ व्या शतकातील असल्याचे म्हटले जाते. विष्णूला समर्पित असलेले ही गुफा आहे. हिंदू मंदिरे असलेली ही गुफा चालुक्यकालीन असल्याचे म्हटले जाते. बदामीत या चार गुफा असून एकावर एक मजले असल्याप्रमाणे त्या दिसतात. तीन गुफा हिंदू धर्माशी तर एक गुफा जैन धर्माशी संबंधित आहे.

पहली गुफा- भगवान शिवला समर्पित ही गुफा असून आतमध्ये १८ भुजा असणारी नटराजनची प्रतिमा पाहायला मिळते.

दुसरी गुफा - दुसरी गुफा भगवान विष्णुला समर्पित आहे.

 

Sri Lad Khan Temple aihole

तिसरी गुफा - तिसऱ्या क्रमांकाची गुफा भगवान विष्णूला समर्पित करण्यात आलीय. येथे हाळे कन्नड भाषेतील शिलालेख पाहायला मिळतो.

चौथी गुफा- चौथ्या क्रमांकाची गुफा भगवान महावीर यांना समर्पित करण्यात आलीय.

Meguti Jaina Basadi aihole

बदामी गुफाच्या समोरील डोंगरावर Lower Shri Shivalaya Gudi आणि Upper Shri Shivalaya Gudi अशी नजरत भरणारी मंदिरे आहेत.

मालेगट्टी शिवालय - एका मोठ्या डोंगरावर हे मंदिर असून बदामी शहरापासून २ किमी. दूर आहे. सातव्या शतकातील प्राचीन पाषाण मंदिरांपैकी हे एक आगे. द्रविड स्तंभांनी बनलेल्या शिवालयात दोन शिलालेख आहेत. अन्नाचे कोठार, किल्ल्याच्या दुतर्फा भिंती दीवारें, अनेक वास्तू आणि एक भूमिगत खोलीदेखील आहे. बदामीला जर तुम्ही गेला तर या किल्ल्याची सफर अवश्य करा. (Historical Tourism)

अगस्त्य तलाव - बदामी गुफाच्या समोर एक मोठे तलाव असून त्यास अगस्त्य तलाव असे नाव आहे. या तलावाच्या आजूबाजूला अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. या तलावाला पवित्र मानले जाते. कारण, या पाण्याने अनेक आजार दूर होतात, असे म्हटले जाते. आजूबाजूला डोंगर आणि त्यावर असलेली मंदिरे तुमचे लक्ष वेधून घेतात.

भूतनाथ मंदिर

भूतनाथ मंदिर - कदंब नागरा स्थापत्य असलेले भूतनाथ मंदिर पटकन दिसत नाही. तलावाच्या शेजारी असलेल्या एका विशाल दगडाखाली हे मंदिर आहे. असं म्हटलं जातं की, या भूतनाथाच्या मूर्तीचा चेहरा सोन्याचा होता. पण, नंतर त्याची तोडफोड करून सोनं चोरून नेण्यात आले.

बदामी पुरातत्व संग्रहालय -

या संग्रहालयाची निर्मिती भारतीय पुरातत्व विभागाने १९७९ मध्ये केली होती. येथे प्राचीन शिलालेख, प्राचीन मूर्ती, शोधण्यात आलेल्या वस्तू, भांडी, दागिने पाहायला मिळतात. १९८२ मद्ये हे संग्रहालय म्हणून उभारण्यात आले. विशेष म्हणजे येथे भग्न अवस्थेतील लज्जा – गौरीची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. ६ व्या शतकापासून ते १६ व्या शतकांदरम्यानचे वस्तू, मूर्ती आदी बाबी येथे पहायला मिळतात. या संग्रहालयात चार गॅलरी आहेत. भगवान शिव आणि भगवान विष्णूची मूर्ती विभिन्न रूपात पाहायला मिळतात. शिवाय गणपती आणि भगवद्गीतेतीत दृश्यदेखील चित्रित करण्यात आले आहेत. शिदलापहाडी गुफा एक अशी गॅलरी आहे जी पर्यटकांना प्राचीन गुफा कशा असतील, याची आठवण करून देते. वास्तुकलेशी संबंधित अनेक वस्तू येथे पाहायला मिळतात.

कसे जाल?
अलमट्टीतून बागलकोट मार्गे बदामीत जाता येते. येथे राहायला अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत.

काय खाल?
अप्पम, इडली, उत्तापा, भात रस्सम, भाजी, वरण आदी.

[caption id="attachment_468312" align="alignnone" width=" aihole[/caption]

ऐहोळे (aihole) -

ऐहोळेतील श्री दुर्ग मंदिर प्रसिद्ध ठिकाण आहे. हे कर्नाटकमधील बदामी येथील एक छोटं गाव ऐहोळमध्ये असून एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरात देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. रस्त्याहून या मंदिराकडे जाताना दोन्हीकडे अनेक मंदिरे दिसतात.

aihole Meguti Jaina Basadi

Sri Lad Khan Temple- ऐहोळेमधील श्री लाड खान मंदिर प्रसिद्ध ठिकाण आहे.

ravan pahdi aihole

Ravana Phadi- ऐहोळमधील रावण पहाडी प्रसिध्द स्थळ असून येथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

Chakra Temple - ऐहोळमधील हे सुंदर मंदिर डोळ्यात न मावणारे आहे.

Sri Virupaksha Temple (Pattadakallu

Museum and Cultural Hall- बागलकोटमधील नव नगर येथे राधाकृष्ण मंदिराच्या शेजारी हे संग्रहालय आहे. ग्रामीण शैली दर्शवणाऱ्या मूर्ती, शिल्पे येथे पहायला मिळतात.

कसे जाल?

बदामी शहरापासून काही अंतरावर ऐहोळे गाव आहे.

[caption id="attachment_468332" align="alignnone" width="653"] mallikarjun temple[/caption]

पट्टडकल (pattadakallu)- ऐहोळेपासून काही किमी. अंतरावर पट्टडकल हे गाव आहे. दक्षिण भारतीय द्रविड आणि उत्तर भारतीय नागरा दोन्ही स्थापत्यशैलीतील मंदिरे पाहता येतात. येथे खूप अनेक मंदिरांचा समूह आहे, जे पाहायला संपूर्ण एक दिवस लागू शकतो. विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिर तुमचे लक्ष वेधून घेतात. अनेक प्रथा-परंपरा, राहमीमान, जीवनपद्धती, परंपरा, युद्धे, सहजीवन, वेशभूषा, केशभूषा, शृंगार अशा अनेक गोष्टी शिल्प आणि मूर्ती रुपात तुम्हाला पाहायला मिळतात. (Historical Tourism)

काय खाल?

येथे लिंगायत पद्धतीचे उत्कृष्ट चवीचे जेवण मिळते. येथील तूप लावलेली शेंगदाणा पोळी नक्की खा! लोणचे, दही, मटकची उसळ, ताक, चपाती, उकडा भात, वरण, रस्सम, आमटी असे सकस जेवण तुम्हाला मिळू शकते.

आणखी काय पाहाल?

पट्टडकलमधील Sri Papanaatha Gudi हे मंदिर पाहण्यासारखे आहे. पटट्डकलच्या आजूबाजूला तुम्ही ही पुढील मंदिरे पाहू शकता. Sri Bachalingeshwara Temple (Bachingudda), Meguti Jaina Basadi, Aihole Museum, पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे.

आपण कुठेही पाहिलं नसेल अशी शिल्पनक्षी पाहता येते. येथे गेल्यानंतर तुमचे मन प्रसन्न होईल. त्याकाळात कोणत्याही पद्धतीची अवजारे, मशीन नसताना इतकी सुंदर कलाकृती कशी निर्माण केली असावी? असा प्रश्न आपसुक पडतो! तुम्हाला जर ऐतिहासिक पर्यटन करायला आवडत असेल तर तुमच्या ट्रीपच्या यादीत ही ठिकाणे नक्की समाविष्ट करा. (Historical Tourism)

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...