Thursday, March 9, 2023

Discover Of Sindhudurg : कोकणात मँग्रुव्हची सफर! देवबागचा संगम पाहाच

तुम्ही मालवण, सिंधुदुर्गला गेला असाल. पण कधी मँग्रुव्ह सफारी कधी केलीय का? मँग्रुव्हची सफारी एक अविस्मरणीय अनुभव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदूर्गच्या समुद्रात मोठ्या डौलात उभारलेला किल्ला तर अद्भूतचं. वर्षानुवर्षे हा किल्ला पाण्यात तग धरून आहे. नौका पर्यटन ही येथील खासियत. (Discover Of Sindhudurg) या नौकाच्या माध्यमातून अनेक लोकांना मिळालेला रोजगार हे विशेष आहे. मागील लेखात आम्ही तुम्हाला पूर्णगड, पावस, कशेळीबद्दल माहिती दिलीय. तुम्ही हा लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. आज आम्ही तुम्हाला मँग्रुव्हची सफर, तारकर्ली, सिंधुदुर्ग, चिवला बीच, रॉक गार्डन, रामेश्वर मंदिर अशा असंख्य पर्यटनस्थळाविषयी सांगणार आहोत. कोकणात फिरताना तुम्ही अनेक कदाचित माहिती नसलेल्या स्थळांना नक्कीच भेट देऊ शकता. (Discover Of Sindhudurg) 

  मालवण - मालवणमध्ये तुम्ही तळाशील बीच, तोंडवली बीच, वेंगुर्ला, वायरी, चिवला, आचरा अशा समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकता. तारकर्ली - तारकर्लीमध्ये तुम्हाला पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसेल. खळखळत्या समुद्र पाहिल्यानंतर लाटांवर मनसोक्त डुंबण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. येथील वॉटर स्पोर्ट्स करण्याचा मोह तर तुम्हाला अजिबात आवरणार नाही. विशेष म्हणजे, येथील वॉटर स्पोर्ट्सचे काही खास पॅकेज असतात. यामध्ये पर्यटकांचे आकर्षण म्हणजे पॅराग्लायडिंग होय. भटकंती करणाऱ्यांनी एकदा का होईना, समुद्रात पॅराग्लायडिंग करण्याचा आनंद नक्की घ्यावा. पॅराग्लायडिंग करताना त्या विशालकाय समुद्राचा कसा स्वर्ग दिसतो, हे हवेत गेल्यानंतरच समजते. कुठे राहाल? - तारकर्लीत अनेक हॉटेल्स आणि निवासाची सोय आहे. 

 काय खाल? - येथील king prawn तर लाजवाब. चिकण, मासे, सोलकढी, चपाती, गोलमा, भाकरी, भाजी, बांगडा फ्रायची चव तुम्ही चाखू शकता. 

  सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. किल्ल्यात जाण्यासाठी बोटी उपलब्ध आहे. समुद्र किनाऱ्यावर किरकोळ एन्ट्री तिकीट काढून तुम्हाला बोटीत बसता येते. सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन बोटीतून किल्ल्यावर जाता येते. किल्ला कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. काय पाहाल?- किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. ही गोड्या पाण्याची विहिर आहे. किल्ल्याच्या बाहेर समुद्राचे खारे पाणी आणि आत बेटावर गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे. यामुळे किल्ल्याच्या आतमध्ये काही रहिवासी अद्यापही राहतात. किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत. याचे बाहेरून दर्शन घेता येते. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. किल्ला परिसर फिरताना तुम्ही टोपी, पाण्याची बाटली आणि खाऊदेखील सोबत ठेवू शकता. 

 किल्ल्यामध्ये काय मिळेल? - किल्ल्याच्या आतमध्ये कोकम, लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम फळ, मँगो ज्यूस, आईस्क्रीम, फळे, बोर, फणस इतर खाऊ मिळेल. 

  देवबाग - सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवबाग समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी कमी असते. नदी आणि सागराचा अद्भूत संगम येथे पाहता येतो. काजू, नारळाची झाडे आणि खारफुटीच्या रांगा आहेत. येथे स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, जेट स्कीईंग, मोटरबोट राईंडचा आनंदही घेता येतो. 

आणखी काय पाहाल? - त्सुनामी बेट : देवबागपासून ३ किमी. अंतरावर त्सुनामी बेट आहे. पद्मगड- देवबागपासून १० किमी. अंतरावर पद्मगड महापुरुष मंदिर आहे. महादेवाची पिंड असून किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात. भरतगड- येथे जाण्यास देवबाग पासून १ तास तर मालवणपासून ४७ मिनिटे लागतात. रॉक गार्डन - येथे ३०० ते ४०० वर्षे जुने खडक पाहायला मिळतात. समुद्रकिनारी या खडकांवर बसून भिरभिरणाऱ्या वाऱ्यात रम्य संध्याकाळ अनुभवता येते. येथे बगीचादेखील आहे. रॉक गार्डन देवबागपासून १३ किमी. अंतरावर आहे. रॉक गार्डनजवळ तुम्ही चिवला बीचवर जाऊ शकता. काय खाल? - येथे विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स असल्याने मालवणी डिशेसची चव चाखता येईल. 

 आंगणेवाडी -मालवण शहरापासून १४ किमी आणि कणकवली पासून ३३ किमी. अंतरावर आंगणेवाडी मंदिर आहे. आंगणेवाडीत प्रसिद्ध श्री भराडीदेवी देवीचे मंदिर असून येथे मोठी यात्रा भरते. सर्जेकोट किल्ला - मालवण बीचपासून १७ मिनिटे अंतरावर हा किल्ला आहे. मँग्रूव्ह सफारी - मालवणपासून ५२ मिनिटांवर आचरा येथे तुम्हाला मँग्रुव्ह सफारी करता येते. रामेश्वर मंदिर - दरम्यान, आचऱ्याला जाताना तुम्ही कोळंब येथ रामेश्वर मंदिराला भेट देऊ शकता.

No comments:

Post a Comment

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...